-
महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने आपल्या कुशल नेतृत्वाने भारतीय संघाचं नाव मोठं केलं, परंतु विराटने आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीलाही न जमलेले ४ पराक्रम करुन दाखवले आहेत.
-
१) ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय – ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय ही भारतीय संघासाठी दुरापास्त गोष्ट होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोनवेळा ऑस्ट्रेलियाचे दौरे केले, मात्र यामध्ये त्याला अपयश आलं.
-
मात्र २०१८-१९ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत हरवणारा पहिला आशियाई संघ हा मान यावेळी भारताने पटकावला. तब्बल ७१ वर्ष जुना विक्रम विराटसेनेने मोडला.
-
२) दक्षिण आफ्रिकेत वन-डे मालिका विजय – ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारत दक्षिण आफ्रिकेतही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. २०१८ च्या आधी भारताने आफ्रिकेत वन-डे मालिकाही जिंकलेली नव्हती. २०११ आणि २०१३ या दोन वर्षांमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आफ्रिकेत वन-डे मालिकेमध्ये अपयश आलं होतं.
-
२०१८ साली कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा भारताला दक्षिण आफ्रिकेत वन-डे मालिकेत मोठा विजय मिळवून दिला. ६ सामन्यांची मालिका भारताने ५-१ अशा मोठ्या फरकाने जिंकली होती.
-
३) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका विजय – न्यूझीलंडचा संघ टी-२० क्रिकेटमध्ये नेहमी भारताच्या वरचढ राहिला आहे. जवळपास एक दशक भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकू शकला नव्हता. २०१७ सालात विराटने इतिहास रचला. नोव्हेंबर २०१७ मध्ये पहिला टी-२० सामना जिंकत भारतीय संघाने आशिष नेहराला अलविदा केलं.
-
यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने २-१ च्या फरकाने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. यानंतर २०२० च्या सुरुवातीस भारताने न्यूझीलंडचा त्यांच्यात मैदानावर टी-२० मालिकेत ५-० ने फडशा पाडला.
-
४) श्रीलंकेत कसोटी मालिका विजय – श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी नेहमी चांगली राहिलेली आहे. मात्र कसोटी मालिका विजयाने भारताला नेहमी हुलकावणी दिली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली होती.
-
मात्र २०१७ साली विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लंकादहन करत कसोटी मालिका ३-० च्या फरकाने जिंकत इतिहास घडवला.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी