-
२०१९ विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत भारतीय संघाची या स्पर्धेतली कामगिरी वाखणण्याजोगी राहिलेली आहे.
-
विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यापासून भारताच्या कसोटी अजिंक्यपद अभियानाला सुरुवात झाली, ज्यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या प्रत्येक कसोटी मालिकेत भारताने वर्चस्व गाजवलं.
-
३६० गुणांसह भारत या स्पर्धेत गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहे.
-
२०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत झालेला पराभव हा भारताचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला पहिला पराभव होता.
-
याचसोबत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या सर्वोत्तम १० खेळाडूंच्या यादीतही भारतीय खेळाडूंचच वर्चस्व पहायला मिळतंय.
-
मयांक अग्रवाल, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथं स्थान ( ९ सामने, ७५९ धावा, ५०.६० ची सरासरी आणि ३ शतकं )
-
अजिंक्य रहाणे, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहावं स्थान ( ९ सामने, ७१५ धावा, ५९.५८ ची सरासरी आणि २ शतकं )
-
विराट कोहली, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नववं स्थान ( ९ सामने, ६२७ धावा, ५२.२५ ची सरासरी आणि २ शतकं )
-
रोहित शर्मा, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दहावं स्थान ( ५ सामने, ५५६ धावा, ९२.६६ ची सरासरी आणि ३ शतकं )
-
मोहम्मद शमी, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर ( ९ सामने, ३६ बळी)
-
इशांत शर्मा, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आठवं स्थान (७ सामने, ३० बळी)
-
उमेश यादव, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दहावं स्थान (५ सामने, २५ बळी)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ