-
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. रोहित शर्मा कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० व्यतिरिक्त आयपीएलमध्येही खेळताना दिसतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा तो कर्णधार आहे. रोहित शर्मा आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. लॉकडाउन असल्याने रोहित शर्मा घऱीच आपली पत्नी रितीकासोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, रोहित शर्मा आणि रितीकाची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजीशी आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
रोहित शर्मा नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतो.
-
रितिका ही युवराज सिंगची मानलेली बहिण आहे.
-
पण तुम्हाला माहिती आहे का रोहितची पत्नी होण्याआधी रितिका त्याची मॅनेजर म्हणून काम पाहत होती. याचवेळी रोहित शर्माचा रितिकावर जीव जडला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घालायचं ठरवलं.
-
रोहितने रितिकाला लग्नाची मागणी एकदम फिल्मी स्टाइलने घातली होती.
-
रोहित शर्मा आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी २८ एप्रिलला रितिकाला घेऊन मुंबईतल्या बोरिवलीमधील एका स्पोर्ट्स क्लबमध्ये गेला होता.
-
तिथे काही वेळ सोबत घालवल्यानंतर रोहित शर्माने रितिकाला एक सरप्राइज दिलं. अजिबात कल्पना नसल्याने रितिकासाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता.
-
रोहित शर्माने त्यावेळी रितीकाला लग्नाची मागणी घातली होती. रोहितने तिथेच क्लबमध्ये रितिकाला अंगठी घालून आपल्या प्रेमाची कबुली दिली.
-
हा क्षण रितिकासाठी खूप महत्त्वाचा होता. अंगठी घालताना रोहितने रितिकाला माझ्याशी लग्न करशील का ? असं विचारलं. ज्याला रितिकानेही लगेच होकार दिला.
-
जून २०१५ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. रोहितने ट्विटरवरुन आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती.
-
नंतर डिसेंबर २०१५ मध्ये रोहित आणि रितिका लग्नबंधनात अडकले.
-
रोहित शर्मा आणि रितिकाच्या लग्नासाठी क्रिडा, मनोरंज, व्यवसाय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
-
फोर्ब्स इंडिया २०१५ च्या भारतातील १०० प्रसिद्ध व्यक्तींमध्ये रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर होता. महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीरनंतर आयपीएल जिंकणारा रोहित शर्मा तिसरा कर्णधार ठरला होता.
-
-
रोहित शर्मा आणि रितिकाला एक गोंडस मुलगी असून तिचं नाव समायरा ठेवण्यात आलं आहे.
-
तिच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ रोहित शर्मा नेहमी शेअर करत असतो.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी