-
तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाउन काळानंतर युरोपियन फुटबॉल कल्चरमधील महत्वाची स्पर्धा म्हणून ओळख असलेली Bundesliga लिग शनिवारपासून पुन्हा एकदा सुरु होणार आहे. अर्थात हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या मैदानांवर खेळवले जातील. (फोटो सौजन्य – राऊटर्स)
-
Borussia Monchengladbach विरुद्ध FC Koln यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र प्रेक्षकांविना खेळवली जाणारी ही स्पर्धा खेळाडूंपासून ते रेफ्रींसाठी पूर्णपणे नवीन अनुभव देणारी ठरणार आहे.
-
चाहत्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी त्यांना यंदा मैदानात प्रवेश मिळणार नाहीये. पण आयोजकांनी आपल्या फॅन्सच्या फोटोचे कटआऊट तयार करुन मैदानातील खुर्च्यांवर लावत स्पर्धेसाठी माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
-
19 € देत चाहत्यांना आपले फोटो मैदानात लावण्याची संधीही आयोजकांनी यावेळी दिली आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार १२ हजार लोकांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला आहे.
-
याचसोबत चाहत्यांना या सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी काही हॅकर्सची खास Mobile App ही तयार केलंय.
-
खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा मैदानात चाहते हजर नसणार आहेत, पण क्रीडा विश्वासचं गाळात रुतत जाणारं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत जर्मनीच्या चॅन्सलर अँजला मार्केल यांनी बोलून दाखवलं होतं.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ