-
मंदिरा बेदी – मंदिरा बेदी ही भारतातील पहिली महिला क्रिकेट अँकर आहे. तिनं आयपीएलच्या दुसऱ्या सिझनमध्ये अँकरींग केलं होतं. २००३, २००७ मध्ये आयसीसी क्रिकेड वर्ल्ड कप आणि २००४, २००६ मध्ये तिनं चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्येही अँकरींग केलं होतं. (फोटो सौजन्य : ट्विटर)
-
अर्चना विजय – अर्चना विजय हिनं आयपीएलच्या चौथ्या सिझनमध्ये अँकरींग केलं होतं. याव्यतिरिक्त तिनं टुअर डायरी फॉर एक्स्ट्रा कव्हर, क्रिकेट मसाला मार के असे अनेक शोदेखील होस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
करिश्मा कोटक – करिश्मा कोटक ही एक ब्रिटीश अभिनेत्री आहे. आयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये तिनं अँकरींग केलं होतं. लहानपणापासून तिला शिक्षिका बनायचं होतं. परंतु ती या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आली. किंगफिशरच्या कॅलेंडरमध्येही ती झळकली होती. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
लेखा वॉशिंग्टन- लेखानं चित्रपटसृष्टीत आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तू आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये दिसली होती. तसंच ती चेन्नई सुपर किंग्सची मोठी फॅन आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
पल्लवी शारदा – पल्लवी शारदा ही अभिनेत्रीसोबतच उत्तम भारतनाट्यमदेखील करते. तीनं मीडिया अँड कम्युनिकेशन्ससोबत 'लॉ'चंदेखील शिक्षण घेतलं आहे. तिचा जन्म ऑस्ट्रेलियातील एका भारतीय कुटुंबात झाला होता. २०१६ मध्ये पहिल्यांदा तिनं आयपीएलमध्ये अँकरींग केलं होतं. तिनं या व्यतिरिक्त माय नेम इज खान या चित्रपटातही काम केलं होतं. (फोटो सौजन्य : ट्विटर)
-
रोशनी चोप्रा – रोशनी चोप्रा हिनं काही मालिकांमधून काम केलं आहे. तीनं दूरदर्शनवर मॅचनंतर होणाऱ्या फोर्थ अंपायर या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
रोशेल राव- रोशेल रावनं आयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये अँकरींग केलं होतं. त्यानंतर बऱ्याच कालावधीसाठी तिनं अँकरींग केलं नाही. २०१२ मध्ये ती फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनचा पुरस्कारही जिंकला होता. यानंतर ती बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. २०१८ मध्ये तिनं किथ सिकेरासोबत लग्न केलं होतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
शिवानी दांडेकर – शिवानी दांडेकर हिनं अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये अँकरींगला सुरूवात केली होती. तिनं आतापर्यंत अनेक टिव्ही शोमध्ये अँकरींग केलं आहे. यामध्ये भारतीय टिव्ही शोचाही समावेश आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
शोनाली नगरानी – तिनं २००६ मध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये होस्ट केलं बोतं. तसंच २००७, २००९ आणि २०१० मध्ये झालेल्या वर्ल्ड कप दरम्यानही होती. २००८ मध्येही तिनं आयपीएल होस्ट केलं होतं. याव्यतिरिक्त २०११ मध्ये इंग्लंडमधील एका चॅनलनं आयपीएलसाठी साईन केलं होतं. २००३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचाही अवॉर्ड तिनं जिंकला होता. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
मयंती लँगर – तिच्या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही. ती क्रिकेटच्या शोमधील सुपरवुमन म्हणून ओळखली जाते. यापूर्वी ती स्टार स्पोर्ट्सच्या अनेक शो मध्ये झळकली होती. २०१० फिफा वर्ल्ड कप, २०१० कॉमनवेल्थ गेम्स आणि क्रिकेटचे शो तिनं होस्ट केले आहेत. २०११ मध्ये तिनं क्रिकेट वर्ल्डकप होस्ट केला होता. तसंच तिनं आयपीएल, टी २० वर्ल्डकपही होस्ट केला होता. तिनं क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीशी लग्न केलं आहे.
-
ईसा गुहा – ईसा गुहा ही भारतीय वंशाची असून ती इंग्लंडकडून क्रिकेट खेळते. तिनं आयपीएलमध्येही अँकरींग केलं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ