-
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीअर लिग या स्पर्धेने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं.
-
आजच्या घडीला भारतातला प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत खेळण्याची संधी आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करत असतो.
-
भारतीय खेळाडूंप्रमाणे परदेशी खेळाडूंचाही या स्पर्धेत खेळण्याकडे कल असतो, कधीकधी काही खेळाडूंच्या पदरी निराशाही पडते.
-
आज आपण आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात केवळ एक सामना खेळलेल्या खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत.
-
१) युनूस खान – आयपीएलच्या पहिल्या हंगामात युनूस खानला संधी मिळाली होती. राजस्थान रॉयल्सने या खेळाडूला आपल्या संघात घेतलं होतं.
-
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात युनूसला संधीही मिळाली, मात्र ७ चेंडूत ३ धावा केल्यानंतर युनूस नंतर एकही आयपीएलचा सामना खेळू शकला नाही.
-
२) मश्रफी मोर्ताझा – २००९ साली झालेल्या स्पर्धेत मोर्ताझा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. डेक्कन चार्जर्स विरुद्धच्या सामन्यात मोर्ताझाच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी ५८ धावा कुटल्या. यानंतर मोर्ताझा आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही.
-
३) अकीला धनंजया – २०१८ साली लंकेच्या या फिरकीपटूने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. दिल्लीविरुद्ध सामन्यात अकीलाला संधी मिळाली, मात्र आपल्या ४ षटकांमध्ये अकीलाला एकही बळी मिळवता आला नाही, यानंतर अकीला धनंजया एकही सामन्यात खेळला नाही.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ