-
सचिन तेंडुलकर आणि अंजली मेहता यांची लव्ह स्टोरी १९९० साली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु झाल्याचे मिड डे ने म्हटले आहे. ( सर्व फोटो सौजन्य – सचिन तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
सचिन त्यावेळी पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरुन परतत होता तर अंजली आईला आणण्यासाठी विमानतळावर आली होती. त्यानंतर एका कॉमन मित्राच्या घरी दोघांची भेट झाली.
-
सुरुवातीला अंजली मेहता आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली, त्यावेळी सचिन तेंडुलकरबद्दल अंजली यांना फार काही माहित नव्हते.
-
दोघांनी डेटिंग सुरु केल्यानंतर सचिन आंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटपटू असल्याचे अंजली यांना समजले.
-
"आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा क्रिकेटबद्दल मला काहीच माहित नव्हते, हेच सचिनला माझ्यामध्ये आवडले असावे असे वाटते. सचिन कोण आहे हे सुद्धा मला माहित नव्हते" असे अंजली यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
-
सचिनला क्रिकेटपटू म्हणून सर्वचजण ओळखायचे. त्यावेळी अंजलीसोबत चित्रपटाला जाताना सचिन वेशांतर करुन जायचा. जेणेकरुन त्याला कोणी ओळखू नये.
-
अंजली यांनी एका मुलाखतीमध्ये चित्रपट पाहताना झालेला किस्सा सांगितला होता. "आम्ही दोघं रोझा चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कोणी ओळखू नये म्हणून सचिनने दाढी लावली होती व चष्मा घातला होता. पण इंटरव्हल दरम्यान त्याचा चष्मा पडला व लोकांनी त्याला ओळखले. त्यानंतर सचिनभोवती एकच गर्दी जमा झाली होती".
-
वरळीमध्ये सचिन तेंडुलकरचं लग्न पार पडलं. त्यावेळी अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री असे मुंबई क्रिकेटमधले दिग्गज उपस्थित होते.
-
सचिनच्या करीयरमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एकालाही तेंडुलकर कुटुंबाने निमंत्रण चुकवले नव्हते. क्रिकेटच्या पीचप्रमाणे संसाराच्या मैदानावरही सचिन आज यशस्वी आहे. अर्जुन-सारा ही दोन मुले या जोडप्याला आहेत. (फोटो सौजन्य – सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
काल सचिन तेंडुलकरच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता. सचिनने पत्नी अंजली आणि कुटुंबीयांसाठी खास आंबा कुल्फी बनवून आपला २५ वा वाढदिवस साजरा केला

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ