-
क्रिकेटला भारतात धर्माचं स्वरुप देण्यात आलेलं आहे. कोणत्याही संघासोबत भारतीय संघाचा सामना असो, चाहते तो पाहण्यासाठी मैदानात गर्दी करतात.
-
भारतीय फलंदाज मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करतात, त्यावेळी मैदानात चाहत्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो.
-
भारतीय संघातले रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, शिखर धवन यासारखे काही फलंदाज आपल्या खास षटकार मारण्याच्या स्टाईलसाठी ओळखले जातात.
-
मात्र आज आपण भारताकडून ८० पेक्षा जास्त सामने खेळूनही फलंदाजीत एकही षटकार मारणं न जमलेल्या खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
-
१) युजवेंद्र चहल – आपल्या ४ वर्षांच्या छोटेखानी कारकिर्दीत चहलला फार कमीवेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. ५२ वन-डे सामने आणि ४२ टी-२० सामन्यांत चहलला फार कमीवेळा फलंदाजीची संधी मिळाली. पण आतापर्यंत मिळालेल्या संधीत चहल फलंदाजी करताना एकही षटकार मारु शकलेला नाही. वन-डे क्रिकेटमध्ये चहलच्या नावावर ७ चौकार जमा आहेत.
-
२) कुलदीप यादव – आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कुलदीपने ६ कसोटी सामने, २१ टी-२० सामने आणि ६० वन-डे सामने खेळले आहेत. कुलदीपलाही तुलनेत फलंदाजीची संधी कमी मिळाली आहे.
-
परंतू मिळालेल्या संधीमध्ये त्याने आतापर्यंत एकही षटकार खेचलेला नाही. तिन्ही स्वरुपातील क्रिकेटमध्ये मिळून कुलदीपच्या नावावर २८ चौकार जमा आहेत.
-
३) इशांत शर्मा – भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा सध्या कसोटी संघाचं प्रतिनिधीत्व करतो. इशांतला आतापर्यंत अनेकदा फलंदाजीची संधी मिळालेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ५७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्याही आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर ८१ चौकार जमा आहेत, परंतू त्याला एकदाही षटकार मारता आलेला नाही.
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…