-
महिला कुस्तीपटू गीता फोगटने २०१० दिल्ली राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास घडवला.
-
राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी गीता पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.
-
याव्यतिरीक्त ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला भारतीय कुस्तीपटू हा मानही गीताच्या नावावर जमा आहे
-
१५ डिसेंबर १९८८ रोजी हरियाणातील एका छोट्याश्या गावात जन्म झालेल्या गीताला कुस्तीचे धडे तिची वडील महावीरसिंह फोगट यांनी दिले.
-
फोगट परिवारावर बॉलिवूडमध्ये दंगल हा सिनेमाही आला होता, ज्यात अमिर खानने महावीरसिंह फोगट यांची भूमिका निभावली होती.
-
२० नोव्हेंबर २०१६ रोजी गीताने आपला सहकारी पवन कुमारसोबत लग्न केलं. डिसेंबर २०१९ मध्ये गीता आणि पवन यांनी एका मुलाला जन्म दिला.
-
आपला मुलगा अर्जुनचे काही खास फोटो गीताने ट्विटरवर शेअर केले आहेत.
-
अर्जुन आता कॅमेऱ्यासमोर पोज द्यायला शिकला असल्याचं गीताने म्हटलं आहे.
-
आपल्या मुलासोबतचे फोटो गीता सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
अर्जुनच्या या फोटोसेशनला सोशल मीडियावरही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते.

“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”