-
क्रिकेट आणि महिला अँकर हे सध्याच्या युगात समीकरणच बनलं आहे.
-
क्रिकेटसारख्या रोमांचक खेळाला ग्लॅमरस टच देण्यासाठी हल्ली एक 'बोल्ड अँड ब्युटीफुल' महिला अँकरचा समावेश असतोच.
-
भारतात शिबानी दांडेकर, अर्चना विजय, मयंती लँगर अशा नावाजलेल्या अँकर आहेत.
-
भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानातदेखील एका तरूणीने जिद्दीने अँकरिंग क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे.
-
पाकिस्तानी क्रिकेटमध्ये ती प्रचंड लोकप्रिय असून तिचे असंख्य चाहते आहेत.
-
त्या 'बोल्ड अँड ब्युटीफुल' पाकिस्तानी अँकरचं नाव झैनाब अब्बास!
-
झैनाब अब्बास हिने एका पॉडकस्ट मुलाखतीत तिचा जीवनप्रवास उलगडला.
-
महिला क्रीडा प्रतिनिधी असल्याने अनेक क्रिकेटपटू सुरुवातीला तिच्याशी बोलायचेही नाहीत, असा अनुभव तिने सांगितला.
-
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धांच्या काही हंगामांमध्ये तिने अँकरिंग केले. पण २०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील तिच्या अँकरिंगने झैनाब घराघरात पोहोचली.
-
झैनाबने स्वत:ला सिद्ध केल्यानंतर, सुरूवातीला पळ काढणारे क्रिकेटपटूही तिच्याशी आपुलकीने वागू लागले आणि मोकळेपणाने गप्पा मारू लागले, असेही झैनाबने त्या पॉडकास्ट मध्ये सांगितले.
-
झैनाबचा जन्म पाकिस्तानमधील लाहोरमध्ये १४ फेब्रुवारी १९८८ ला झाला.
-
इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
-
झैनाबची आई सक्रिय राजकारणात आहे. झैनाब तिच्या आईला प्रेरणास्थान मानते.
-
मार्केटिंग अँड स्ट्रेटेजी या विषयात एमबीए केल्यावर तिने क्रीडा पत्रकार म्हणून आपली वाटचाल सुरू केली.
-
IPL मधील धोनीच्या खेळीची स्तुती केल्यामुळे झैनाबवर पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सनी टिकेची झोड उठवली होती.
-
विराट कोहलीसोबत २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत झैनाबने सेल्फी काढला, त्यानंतरच्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला.
-
तेव्हापासून, झैनाबसोबत सेल्फी काढणारा खेळाडू शून्यावर बाद होतो असे मेसेज व्हायरल झाले होते.
-
झैनाबने आतापर्यंत 'सवाल क्रिकेट का' आणि 'क्रिकेट देवांगी' अशा दोन कार्यक्रमाचे अँकरिंग केले आहे.
-
झैनाबचा आवडता बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आहे.
-
जागतिक स्तरावर क्रीडाक्षेत्रात अँकरिंग करणारी झैनाब पाकिस्तानातील पहिलीच महिला ठरली आहे.
-
सर्व फोटो – इन्स्टाग्राम / झैनाब अब्बास
Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video