-
आयपीएलच्या तेराव्याा हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
-
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व संघातील खेळाडूंना २० ऑगस्टनंतर युएईला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली आहे. युएईत प्रत्येक संघाने आपल्या खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास पंचतारांकित हॉटेलची सोय केली आहे.
-
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे खेळाडू अबु-धाबी येखील Ritz-Carlton या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहेत. या हॉटेलमध्ये खेळाडूंसाठी खास सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत. पाहूयात या हॉटेलची खास झलक…
-
विमानतळापासून अवघ्या २० मिनीटांच्या अंतरावर असलेलं हे हॉटेल सर्व सोयी-सुविधायुक्त आहे. ५७ एकराच्या प्रशस्त जागेत या हॉटेलचं बांधकाम करण्यात आलं आहे. (छायाचित्र सौजन्य – Ritz-Carlton)
-
कोलकात्याच्या खेळाडूंसाठी खास वेगळ्या रुम्सचं बुकींग करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. (छायाचित्र सौजन्य – Ritz-Carlton)
-
या हॉटेलमधलं डायनिंग रुमही अतिशय सुंदर आहे. (छायाचित्र सौजन्य – Ritz-Carlton)
-
खेळाडूंना सराव आणि व्यायामासाठी २४ तास हेल्थ क्लबची सुविधाही या हॉटेलमध्ये आहे. (छायाचित्र सौजन्य – Ritz-Carlton)
-
याव्यतिरीक्त स्पा आणि इतर सोयी-सुविधांचाही फायदा इथे खेळाडूंना घेता येणार आहे. (छायाचित्र सौजन्य – Ritz-Carlton)
-
हॉटेलच्या मध्यभागी असलेला स्विमींग पूल हे या ठिकाणचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. (छायाचित्र सौजन्य – Ritz-Carlton)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ