-
आयपीएलच्या तेराव्याा हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
-
सध्या सर्व संघ यासाठी तयारी करतायत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही जोमात तयारी सुरु केली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – Mumbai Indians official Website)
-
मुंबई इंडियन्सचे खेळाडू Reliance Corporate Park च्या मैदानावर सराव करत आहेत.
-
खेळाडूंना सरावात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने खास काळजी घेतली आहे.
-
खेळपट्टीवर भक्कम छत उभारल्यामुळे खेळाडू आता भर पावसातही तयारी करु शकणार आहेत.
-
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करण्यात येत आहे.
-
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ड्रेसिंग रुम
-
तसेच खेळाडूंना इकडे व्यायामाची सोयही करुन देण्यात आली आहे.
-
कितीही जोराचा पाऊस आला तरीही खेळाडू आपला सराव कायम सुरु ठेवू शकणार आहेत.
-
रोहित शर्मासह मुंबईचे सर्व महत्वाचे खेळाडू ट्रेनिंग कँपसाठी हजर झाले आहेत.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ