-
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा झाली असून सर्व संघ युएईला रवाना होण्याआधी आपापल्या ट्रेनिंग कँपमध्ये सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची Reliance Corporate Park घणसोली येथील मैदानावर खास सोय करण्यात आली आहे. (सर्व फोटो सौजन्य – Mumbai Indians Twitter Account)
-
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही आगामी हंगामासाठी कसून तयारी करतो आहे.
-
काही दिवसांपूर्वीच बाबा झालेला हार्दिक पांड्या लॉकडाउननंतर पहिल्यांदाच आपल्या परिवाराला सोडून मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. ट्रेनिंग कँपमध्ये त्याने फलंदाजीचा सराव सुरु केला आहे.
-
दुखापतीमुळे गेले काही महिने पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला होता…त्यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी फॉर्मात येणं पांड्या आणि मुंबई इंडियन्ससाठी गरजेचं आहे.
-
टी शर्ट न घालता सराव करतानाचे काही फोटो मुंबई इंडियन्सने शेअर केले आहेत.
-
हार्दिक पांड्याला आपला जुना सूर पुन्हा गवसल्यास गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी ही गोष्ट चांगलीच फायदेशीर ठरणार आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ