-
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होणार आहे. करोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व नियम पाळण्याच्या दृष्टीकोनातून सर्व संघ युएईत दाखल झालेत. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. (सर्व फोटो सौजन्य – RR Facebook Account)
-
संजू सॅमसनकडून यंदा संघाला मोठ्या अपेक्षा असणार आहेत. धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून आपली जागा पक्की करण्यासाठी संजू सॅमसनकडे चांगली संधी आहे.
-
युएईत क्वारंटाइन झालेल्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये मिळेल त्या पद्धतीने सराव करत स्वतःला व्यस्त ठेवणं पसंत केलंय.
-
संघातील खेळाडूंसाठी व्यवस्थापनाने फिटनेस ट्रेनिंगची खास सोय केली आहे.
-
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ यंदा मैदानात उतरेल.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ