-
आयपीएलच्या तेराव्याा हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
-
युएईत दाखल झालेल्या आयपीएल संघांनी आता सरावाला जोरदार सुरुवातही केली आहे.
-
यंदाची स्पर्धा भारताबाहेर होत असल्यामुळे गोलंदाजांसमोर आव्हान असणार आहे. अनेकदा आयपीएलमध्ये फलंदाज गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडतात आणि खोऱ्याने धावा वसूल करतात. आज आपण आयपीएलच्या इतिहासात खोऱ्याने धावा देणाऱ्या दोन भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
२) उमेश यादव (वर्ष २०१३, ५०८ धावा) – २०१३ साली दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या उमेशची फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली होती. या हंगामात १६ सामने खेळताना उमेशने ७.७८ च्या इकोनॉमी रेटने ५०७ धावा दिल्या होत्या.
-
या हंगामात उमेशने १६ बळीही घेतले परंतू यासाठी त्याला खूप धावा मोजाव्या लागल्या.
-
१) सिद्धार्थ कौल (वर्ष २०१८, ५४७ धावा) – सनराईजर्स हैदराबाद संघाचा प्रमुख खेळाडू असलेल्या सिद्धार्थ कौलची एकंदरीत कामगिरी आश्वासक राहिलेली आहे. मात्र २०१८ हे साल त्याच्यासाठी वाईट गेलं. १७ सामन्यांत सिद्धार्थने ८.२८ च्या इकोनॉमी रेटने ५४७ धावा दिल्या होत्या.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ