-
IPL 2020चे आयोजन युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
-
यंदाचा हंगाम युएईत खेळवला जाणार असल्यामुळे सर्वच खेळाडूंचा कस लागणार आहे. टी-२० क्रिकेट म्हटलं की कोणता खेळाडू शतक झळकावणार याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असतं….आज आपण आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
-
३) विराट कोहली – २०१६ साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळत असताना विराटने ४७ चेंडूत शतक साजरं केलं होतं. पावसामुळे व्यत्यय आलेल्या हा सामना १५ षटकांचा खेळवण्यात आला. ज्यात विराटच्या ५० चेंडूतील ११३ धावांच्या खेळीच्या जोरावर RCB ने २११ धावांचा डोंगर उभा केला होता.
-
२) मुरली विजय – २०१० साली चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना मुरली विजयने ४६ चेंडूत शतक झळकावलं होतं. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुरली विजयच्या १२७ धावांच्या तुफान खेळीच्या जोरावर २४६ धावा फलकावर लावल्या होत्या. (फोटो सौजन्य – AP)
-
१) युसूफ पठाण – २०१० साली राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असताना युसूफ पठाणने मुंबईविरुद्ध ३७ चेंडूत शतक झळकावलं होतं. तरीही राजस्थानला या सामन्यात एका धावेने पराभव स्विकारावा लागला होता.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”