-
आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
-
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत ही स्पर्धा खेळलली जाईल.
-
युएईत आल्यानंतर क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर संघांनी सरावाला सुरुवात केली आहे.
-
राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य – RR Facebook Account)
-
तब्बल ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर हे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले आहेत.
-
सर्व संघ आणि खेळाडूंसाठी बीसीसीआयने मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत.
-
सर्व संघ आणि खेळाडूंना या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
-
चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातील एक खेळाडू आणि इतर सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.
-
राजस्थानच्या संघात यशस्वी जैस्वालसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे
-
स्टिव्ह स्मिथकडे यंदा संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय.
-
त्यामुळे यंदा राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”