-
आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या RCB संघाची कामगिरी संमिश्र स्वरुपाची आहे. ३ सामन्यात २ विजय मिळवलेला RCB चा संघ कमी धावगतीमुळे चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केल्यानंतर RCB च्या खेळाडूंनी आपल्या हॉटेलवर आनंद साजरा केला. (छायाचित्र सौजन्य – RCB सोशल मीडिया)
-
RCB च्या खेळाडूंनी हॉटेलच्या पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळत सामन्याचा शीण कमी केला.
-
एबी डिव्हीलियर्सने या सामन्यात महत्वाची भूमिका निभावत संघाचा विजय सोपा केला.
-
मुंबईविरुद्ध सामन्यात विजय मिळवला असला तरीही गोलंदाजीतली खराब कामगिरी हा RCB साठी चिंतेचा विषय कायम आहे.
-
एका क्षणी पिछाडीवर पडलेल्या मुंबई इंडियन्सने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना बरोबरीत सोडवला होता.
-
त्यामुळे विजय मिळवला असला तरीही कर्णधार विराट कोहलीला स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्यापासून संघाची कामगिरी सुधरवण्याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल