-
कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि मधल्या फळीत कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात १९१ धावांचं लक्ष्य उभं केलं. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)
-
रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर पोलार्डने पांड्याच्या साथीने अबु धाबीच्या मैदानावर चौकार-षटकारांची बरसात केली. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत पोलार्डने २० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या.
-
आपल्या या धडाकेबाज खेळीदरम्यान पोलार्डने कोणकोणते विक्रम केले हे जाणून घेऊयात…
-
आयपीएलमध्ये एका डावात ४ किंवा ४ पेक्षा जास्त षटकार मारण्याची पोलार्डची ही १६ वी वेळ होती. यादरम्यान त्याने धोनी आणि रोहितच्या कामगिरीशी बरोबरी केली.
-
युएईत पोलार्डची कामगिरी वाखणण्याजोगी आहे. युएईत आयपीएलमध्ये गेल्या ६ डावांत त्याने अनुक्रमे नाबाद ३३, ७८, १८, नाबाद १३, नाबाद ६०, नाबाद ४७ धावा केल्या आहेत.
-
याचसोबत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पोलार्डने सुरेश रैनाशी बरोबरी केली. पंजाबविरुद्ध पोलार्डच्या नावावर ३५ षटकार जमा आहेत.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ