आयपीएलच्या १३ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघ विजयासाठी खेळत आहे. १५ दिवसांमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. आजा आपण आयपीएलमधील कधी न तुटणाऱ्या विक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत… आयपीएलमध्ये एका डावात वयक्तिक सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये आरसीबीकडून खेळताना गेलने ६६ चेंडूत १७५ धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासातील हा वयक्तिक सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. विशेष म्हणजे… प्रतिस्पर्धी संघ असलेल्या पुण्याच्या संपूर्ण संघालाही १७५ धावा करता आल्या नाहीत. पुण्याचा संघ १३३ धावांत गारद झाला होता. ख्रिस गेलच्या तुफानी १७५ धावांच्या बळावर आरसीबीने निर्धारित २० षटकांत २६३ धावांचा डोंगर उभा केला आहे. ही आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलमधील दुसरी सर्वाधिक धावसंख्याही आरसीबीच्या नावावर आहे. २०१६ मध्ये गुजराजविरोधात आरसीबीने तीन विकेटच्या मोबदल्यात २४८ धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंखेच्या विक्रमाबरोबर निचांकी धावसंखेचा विक्रमही आरसीबीच्या नावावर आहे. केकेआर संघाने २०१७ मध्ये आरसीबीला दहाव्या षटकांत ४९ धावांवर रोखलं होतं. लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोलकाता संघाच्या नावावर आहे.केकेआरने आयपीएलमध्ये लागोपाठ दहा सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला लागोपाठ दहा सामने जिंकता आले नाहीत. कोलकाता संघाने २०१४ च्या हंगामात लागोपाठ ९ सामने जिंकत चषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर २०१५ च्या सुरुवातीला पहिलाच सामना जिंकत सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुंबईच्या अल्जारी जोसफच्या नावावर आहे. २०१९ मध्ये सलामीच्या सामन्यात हैदराबादविरोधात ६ विकेट घेतल्या होत्या. अल्जारी जोसफने हैदराबादविरोधात ३.१ षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात सहा बळी घेतले होते. यामध्ये एक षटक निर्धाव टाकलं होते. एका डावांत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. १७५ धावांची तुफानी खेळी करताना गेलने १७ षटकार लगावले होते. आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम राहुलच्या नावावर आहे. राहुलने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. राहुलनंतर युसूफ पठाण आणि सुनील नारायण यांचा क्रमांक लागतो… या दोघांनी १५-१५ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. १७५ धावांची वेगवान खेळी करताना गेलने अवघ्या ३० चेंडूत शतक झळकावलं होत. एका षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. गेलने एका षटकांत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३६ धावा काढल्या होत्या. कोची टस्करच्या परमेश्वरणच्या एका नो बॉलवरही गेलने षटकार लगावला होता. नोबॉलमुळे परमेश्वरण त्या षटकांत ३७ धावा दिल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिकचा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. मिश्राने हॅट्ट्रिकची हॅट्ट्रिक केली आहे. आयपीएलमध्ये अमित मिश्राने आतापर्यंत तीनवेळा हॅट्ट्रिक केली आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने २०१६च्या हंगामात ९७३ धावांचा पाऊस पाडला होता. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाला ९०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. एका हंगामात सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये ४ शतकं लगावली होती. आय़पीएलमधील सर्वात मोठी भागीदारीचा विक्रम विराट कोहली आणि डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहलीने २२९ धावांची भागिदारी केली आहे. या विक्रमात दुसऱ्या स्थानावरही हीच जोडी आहे. यांनी मुंबईच्या विरोधात २१५ धावांची भागिदारी केली. -
आयपीएलमध्ये दहा वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा विक्रम चेन्नई संघाच्या नावावर आहे. आतापर्यंत १२ हंगामात चेन्नईने दहा वेळेस प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. दोन वर्ष चेन्नईच्या संघावर बंदी होती. चेन्नईचा संघ आतापर्यंत ८ वेळा अंतिम सामना खेळला आहे. चेन्नईने तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ कुल्लू मनालीतला व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल