-
मुंबईचा क्रिकेटपटू आणि यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेसाठी रविवारचा दिवस खास होता. अजिंक्यची लाडकी मुलगी आर्या एक वर्षाची झाली. यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने खास बर्थ-डे पार्टीचं आयोजन केलं होतं. (सर्व छायाचित्र – दिल्ली कॅपिटल्स फेसबूक अकाऊंट)
-
आर्याच्या आवडीचा केक यावेळी तयार करण्यात आला होता.
-
यावेळी आर्यासाठी दिल्ली कॅपिटल्सची एक खास जर्सीही भेट म्हणून देण्यात आली.
-
आपल्या सहकाऱ्याच्या मुलीचा वाढदिवस म्हणल्यावर शिखरलाही रहावलं नाही आणि त्याने आर्याला उचलून घेतलं.
-
आतापर्यंत अजिंक्यला दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अजिंक्यला खेळण्याची संधी कधी मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
-
अजिंक्य, पत्नी राधिका…आर्यासोबत
-
तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने Player Transfer Window अंतर्गत अजिंक्यला दिल्ली संघाकडे दिलं आहे.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”