-
(संग्रहित छायाचित्र)
त्याआधी पॉइंट टेबलवर एक नजर मारुयात…. के. एल राहुलच्या पंजाब संघानं सलग पाचवा विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पंजाबच्या विजयामुळे गुणतालिकेत बराच बदल झाला असून इतर संघाची प्ले ऑफमध्ये जाण्याची समिकरणेही बदलली आहेत. सध्या प्लेऑफची स्पर्धा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात १२ मुद्दे पाहूयात… कोणताही एक संघ फक्त २० गुणांपर्यंत पोहचू शकतो. मुंबई, दिल्ली आणि आरसीबी या तिन्ही संघापैकी कोणताही एक संघ २० गुणांपर्यंत पोहचू शकतो. मुंबई, दिल्ली आणि आरसीबी यापैकी एका संघानं २० गुण मिळवल्यास इतर दोन संघांना २० गुणांपर्यंत पोहचता येणार नाही. मुंबई, दिल्ली आणि आरसीबीवगळता एकाही संघाला १६ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवता येणार नाही. पंजाब आणि कोलकाता हे दोन्ही संघ जास्तीत जास्त १६ गुणांपर्यंत मजल मारु शकतात. आयपीएलमधील साखळी फेरीतील सध्या दहा सामने बाकी आहेत. पण आठपैकी सात संघ कसे आणि कोणत्या क्रमाने प्ले ऑफमध्ये पोहचतील यासंदर्भात अनेक शक्यता असून संघांचे क्रम हे कामगिरीनुसार ठरत असले तरी समान गुण असल्यावर धावगती गृहिती धरली जाणार असल्याने ठोसपणे आताच कोणता संघ कुठे असेल सांगता येणार नाही. प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा चेन्नईचा पहिलाच संघ आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी राज्यस्थान संघाला दोन्ही सामने जिंकवे लागणार आहेत. राज्यस्थान संघानं १४ गुण मिळवले तरीही ते प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता फक्त तीन टक्के इतकीच असल्याचे जाणकार सांगतात. तरी क्रिकेट हा शक्यतांचा खेळ असल्याने फासे कधी आणि कसे पलटतील सांगता येत नाही. त्यामुळे राजस्थान उरलेले दोन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धांवर हल्लाबोल करत मोठा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले यात शंका नाही. राज्यस्थानप्रमाणे हैदराबाद संघालाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. हैदराबाद संघाला उर्वरित तिन्हीही सामने जिंकावे लागतील. प्लेऑफमध्ये पोहचण्याची ७ टक्के शक्यता आहे. मुंबई, दिल्ली आणि आरसीबी या संघांना प्ले-ऑफमध्ये पोहचण्याची सर्वाधिक संधी आहे. या तिन्ही संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची ९५ टक्के शक्यता आहे. गुणतालिकेत पहिल्या तीन क्रमांकावर असणारे संघांची प्लेऑफच्या बाहेर जाण्याची शक्यता ०.८ टक्के इतकी आहे. तर चौथ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता ४.७ टक्के इतकी आहे. कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघाना चौथ्या क्रमांकावर पोहचण्याचे सर्वाधिक चान्स आहेत. दोन्ही संघाचे १२-१२ गुण असून दोन्ही संघाचे दोन सामने बाकी आहेत. त्यासाठी दोन्ही संघाला तळाशी असलेल्या सीएसकेचा पराभव करावा लागेल. त्यामुळेच चेन्नईने यापैकी कोणाचाही पराभव केला तर हम तो डुबे है तुम को भी ले डुबेंगे सनमसारखी परिस्थिती होईल असं सध्या म्हटलं जात आहे. कोलकाता किंवा पंजाब संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचण्याची शक्यता कमीच आहे. (सर्व छायाचित्रे आयपीएलच्या संकेतस्थळावरुन घेतली आहेत)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ