-
भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'टीम इंडिया'त IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले, पण धक्कादायकरित्या तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला वगळण्यात आलं.
-
रोहितला वगळण्याच्या या निर्णयानंतर BCCI आणि निवड समितीवर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली. अनेकांनी यासाठी विराट कोहलीला दोषी ठरवत अंतर्गत राजकारणाचा रंग दिला.
-
त्यानंतर, रोहित शर्माच्या दुखापतीबाबत रविवारी (१ नोव्हें) BCCIची वैद्यकीय समिती माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आलं. तसेच, या माहितीनंतर रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील समावेशाबाबत सांगता येईल असंही BCCIकडून सांगण्यात आलं. पण त्या समितीचा अहवाल अद्याप तरी जाहीर करण्यात आलेला नाही.
-
अशा परिस्थितीत, निवड समितीवर प्रचंड टीका होत असतानाच अखेर खुद्द BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील समावेशाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
-
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हणाले, "रोहित शर्मा सध्या दुखापग्रस्त आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा असं साऱ्यांनाच वाटतं आहे."
-
"रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सांगायचं झालं तर आम्हालाही असंच वाटतं की रोहितने तंदुरूस्त व्हावं आणि दौऱ्यावर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करावं."
-
रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोघांच्या दुखापतीवर BCCI लक्ष ठेवून आहे. रोहित जर तंदुरूस्त आहे असं वाटलं तर निवड समिती नक्कीच त्याच्या समावेशाबाबत पुनर्विचार करेल", असा विश्वास सौरव गांगुलीने व्यक्त केला.
-
सध्या संघातील बहुतांश खेळाडू Bio Bubble मध्ये आहेत. तेथूनच त्यांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रयाण होणार आहे. अंदाजे दौरा सुरू होण्याच्या १० दिवस आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे.
-
"जर रोहित आणि इशांत यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली, तर त्यांना संघ रवाना झाल्यानंतर काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवणं शक्य आहे. कारण ऑस्ट्रेलियासाठी विमान उड्डाणं सुरूच असणार आहेत, असं गांगुलीने सांगितलं.
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य