आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखलं जातं. आयपीएलच्या १३ व्या हंगमातही मुंबईनं दिल्लीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.. पाहूयात मुंबई आयपीएलमध्ये पोहचल्यानंतर काय-काय निकाल लागले होते… १३ आयपीएल स्पर्धेत मुंबई सहाव्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. आतापर्यंत मुंबईनं चार वेळा चषकावर नाव कोरलं आहे. तर एकदा उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं आहे. २००८ पासून आतापर्यंत ६वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१०, २०१३, २०१५,२०१७ आणि २०१९ मध्ये मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता. २०१० मध्ये मुंबई पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला होता. चेन्नईनं २२ धावांनी पराभव तर चषकावर नाव कोरलं होतं. मुंबईकडून पोलार्ड, सचिन, सौरभ तिवारी, रायडू आणि मलिंगा यांनी अप्रितम खेळाचं प्रदर्शन केलं होतं. २०१३ मध्ये मुंबईने पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारत २०१० मधील पराभवाचा वचपा काढत चेन्नईचा पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईनं पहिल्यांदाच आयपीएल चषकावर नाव कोरलं. २०१५ मध्ये मुंबईनं दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारत चषकावर नाव कोरलं. यावेळी मुंबईनं पुन्हा चेन्नईचा पराभव केला. अंतिम सामन्यात चेन्नईला ४१ धावांनी पराभव पाहावा लागला. २०१७ मध्ये मुंबईनं चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली. मुंबईनं रायझिंग पुणे सुपर जायंटला पराभूत करत तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले होते. अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा चेन्नईच्या संघाचा पराभव करत मुंबईनं २०१९ मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरलं. मुंबईचा हा चौथा आयपीएल चषक होता. तर मुंबई पाचव्यांदा अंतिम सामन्यात पोहचली होती. आता २०२० मध्ये मुंबईला पाचव्यांदा चषक उंचविण्याची संधी आहे. आतापर्यंत अंतिम सामन्यात मुंबईचा फक्त एकदा पराभव झाला आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी