दोन सामन्यानंतर आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा विजेता-उपविजेता संघ आपल्याला मिळेल. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या आयपीएलमध्येही धावांचा पाऊस पाहायला मिळाला.. पण काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीमध्ये निराशा केली. यंदाच्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंची ही अखेरची आयपीएल असू शकते. खेळाडूंची यंदाची कामगिरी पाहाता पुढील वर्षी त्यांना संघात स्थान मिळणं कठीण दिसतेय. पाहूयात कोणते आहेत ते खेळाडू…. ( वय आणि कामगिरी याचा विचार करुन सर्व खेळाडूंची निवड करण्यात आली आहे….) शेन वॅटसनने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो पुढील हंगामात खेळताना दिसणार नाही… डेल स्टेनची यंदाची आयपीएलमधील कामगिरी पाहाता आणि त्याचं वय पाहाता पुढील वर्षी तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. तीन सामन्यात स्टेनला फक्त एक विकेट घेण्यात यश मिळालं आहे. ४० वर्षीय हरभजन सिंहने यंदाच्या वर्षी आपल्या वैयक्तीक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. पुढील वर्षी तो खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. केदार जाधवची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी तुम्हाला माहितच आहे. जाधवला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे चेन्नई पुढील आयपीएलमध्ये त्याच्यावर विश्वास दाखवेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ४१ वर्षीय इम्रान ताहिरही पुढच्या वर्षी आयपीएल खेळताना दिसण्याची शक्यता नाही. मुरली विजयलाही यंदाच्या आयपीएलमध्ये कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. ३७ वर्षीय मुरली विजय पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याची शक्यता धुसून आहे. १३ व्या हंगामात ख्रिस गेलची कामगिरी दमदार राहिली आहे. मात्र, गेल सध्या ४१ वर्षाचा आहे. त्यामुळे पुढील वर्षी त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. विराट कोहलीनं यंदा आयपीएलमध्ये ३५ वर्षीय पार्थिव पटेलला एकही संधी दिली नाही. देवदत्त पडीकलनं सलामीची जबाबदारी पार पाडल्यामुळे पार्थिव पुढील वर्षी खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे. उमेश यादवलाही यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. यादवला दोन सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. दोन सामन्यात उमेश यादवनं ८३ धावा दिल्या आहेत. मोहित शर्मा, आणि वरुण ऐरॉन हे भारतीय खेळाडूही पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमीच दिसतेय. यंदाच्या वर्षी यांना आपली कामगिरी चोख बजावता आली नाही.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी