-
आयपीएलच्या तेराव्या हंगामात अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत करण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा चांगलाच सूर गवसला. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांच्या अपयशामुळे दिल्लीने शिखर धवन सोबत मार्कस स्टॉयनिसला संधी दिली. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL)
-
दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी फटकेबाजी करत ८६ धावांची भागीदारी करत हैदराबादच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली.
-
स्टॉयनिस माघारी परतल्यानंतरही शिखर धवनने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह त्याने ७८ धावा केल्या.
-
अर्धशतकी खेळीदरम्यान शिखर धवनने आयपीएलच्या तेराव्या हंगामात ६०० धावांचा टप्पाही पार केला. या खेळीच्या निमीत्ताने एका हंगामात ६०० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या महत्वपूर्ण भारतीय फलंदाजांच्या यादीत शिखरला स्थान मिळालं आहे. पाहूयात कोण आहेत या यादीतले इतर फलंदाज –
-
-
२) विराट कोहली – २०१३ आणि २०१६
-
३) रॉबिन उथप्पा – २०१४
-
४) ऋषभ पंत – २०१८
-
५) लोकेश राहुल – २०१८ आणि २०२०
-
६) अंबाती रायुडू – २०१८
-
७) शिखर धवन – २०२०
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल