मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा पराभव करत यंदाच्या आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. युएईमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देत क्रीडा प्रेमींची मनं जिंकली आहेत. आयपीएलनं भारतीय संघाला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत.. यंदाच्या आयपीएलमधील काही खेळाडू भारतीय संघाचं भविष्य ठरु शकतात.. पाहूयात कोण आहेत ते खेळाडू…. इशान किशन यानं यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील १४ सामन्यात ५१६ धावा काढल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. देवदत्त पडीकलनं १४ सामन्यात पाच अर्धशतकाच्या मदतीनं ४७३ धावा काढल्या आहेत. मराठमोळा ऋतुराज गायकवाडला जास्त संधी मिळाली नाही. मात्र अखेरच्या काही सामन्यात त्यानं प्रभावी फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाडने सहा सामन्यात २०४ धावा काढल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकाचा समावेश आहे. शुभमन गिलनं यंदाच्या आयपीएल स्पर्धेत १४ सामन्यात ४४० धावा केल्या आहे. यामध्ये तीन अर्धशतकाचा समावेश आहे. सुर्यकुमार यादवनं १६ सामन्यात ४ अर्धशतकाच्या मदतीनं ४८० धावा केल्या आहेत. हैदराबाद संघातील नटराजन यानं १६ सामन्यात १६ विकेट घेत सर्वांना प्रभावित केलं आहे. आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक यॉर्करची नोंद नटराजन याच्या नावावर आहे. राहुल चहरनं १५ सामन्यात १५ बळी घेतले आहेत. रवी बिश्नोईनं १४ सामन्यात १२ जणांना बाद केलं. शिवम मावीनं ८ सामन्यात बळी मिळवले आहेत. -
कमलेश नागरकोटी यानं १० सामन्यात ५ बळी घेतले आहेत.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी