मुंबई इंडियन्स संघानं अंतिम सामन्यात दिल्लीचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं. १३ व्या हंगामात अनेक खेळाडूंनी आपल्या खेळीनं प्रभावित केलं. तर काहींच्या खराब कामगिरीचा संघाला फटका बसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. कर्णधार धोनीची कामगिरीही लौकिकास साजेशी झाली. परिणामी संघाला प्ले ऑफमध्येही पोहचता आलं धोनी. कामगिरीच्या बाबतीत धोनी संघ मालकाला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. धोनीनं 14 सामन्यात फक्त २०० धावा केल्या आहेत. धोनीला १५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. धोनीच्या एका धावेसाठी चेन्नई संघाला साडेसात लाख रुपये मोजावे लागले आहेत. मुंबईला पाचव्यांदा चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला १५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. यंदाच्या हंगामात रोहित शर्मानं १५ सामन्यात २६४ धावा केल्या आहेत. रोहितची एक धाव ५ लाख ६८ हजार रुपयांना पडली आहे. (संग्रहित छायाचित्र) दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला १५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. पंतला १६ सामन्यात २८७ धावा काढता आल्या. पंतची एक धाव संघाला पाच लाख २३ हजार रुपयांना पडली आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला १७ लाख रुपयांना रिटेन करण्यात आलं होतं. कोहलीनं यंदाच्या हंगामात १५ सामन्यात ४६६ धावा ठोकल्या. कोहलीच्या एका धावेसाठी संघाला तीन लाख ६४ हजार रुपये मोजावे लागले आहेत. राजस्थानचा कर्णधार स्टीव स्मिथला १२.५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. स्मिथनं १४ सामन्यात ३४४ धावा काढल्या आहेत. स्मिथच्या एका धावेसाठी संघाला तीन लाख ६३ हजार रुपये मोजावे लागले. (फोटो- IPL.com) हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला १२.५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. वॉर्रननं १६ सामन्यात ५४८ धावा ठोकल्या आहेत. वॉर्नरच्या एका धावेसाठी संघाला दोन लाख २८ हजार रुपये मोजावे लागले. (संग्रहित छायाचित्र) देवदत्त पडिक्कलनं पहिल्याच आयपीएल हंगामात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पडिक्कलनं विराट कोहलीला मागे टाकत १५ सामन्यात ४६६ धावा काढल्या. पडिक्कलला २० लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये आरसीबीनं खरेदी केलं होतं. पडिक्कलची एक धाव संघासाठी ४ हजार २२८ रुपयांना पडली आहे. ( फोटो सौजन्य – Saikat Das / Sportzpics for BCCI) पहिला आयपीएल हंगाम खेळणारा युवा ऋतुराज गायकवाडला २० लाख रुपयांत खरेदी केलं होतं. गायकवाडनं सहा सामन्यात २०४ धावा काढल्या आहेत. गायकवाडच्या एका धावेसाठी चेन्नईला ९ हजार ८०३ रुपयांना पडली आहे. कोलकाताचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिलनं १४ सान्यात ४४० धावा काढल्या. गिलला एक कोटी ८० लाख रुपयांत खरेदी करण्यात आलं होतं. गिलची एक धाव कोलकाताला ४० हजार ९०९ रुपयांना पडली आहे. (फोटो सौजन्य – Vipin Pawar / Sportzpics for BCCI) -
पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यंदाचा सर्वात अपयशी प्लेअर ठरला आहे. मॅक्सवेलची एक धाव संघाला ९ लाखांपेक्षा जास्त किंमतीची ठरली आहे. मॅक्सवेलला १०.७५ कोटींना पंजाब संघानं विकत घेतलं होतं. १३ सामन्यात मॅक्सवेलनं फक्त तीन विकेट घेतल्या आहेत. तर फक्त १०८ धावाच करता आल्या. मॅक्सवेलच्या एका विकेटसाठी ३.५८ कोटी तर एका धावेंसाठी ९ लाख ९५ हजार रुपये मोजावे लागले आहेत.
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी