-
IPL स्पर्धा सुरू झाल्यापासून १३ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा CSK संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. कर्णधार धोनीपासून ते शेन वॉटसन, केदार जाधवपर्यंत सारेच अनुभवी खेळाडू अपयशी ठरले.
-
यंदाच्या IPLमध्ये शेवटच्या सामन्यानंतर धोनीने संघाची नव्याने बांधणी करण्याचे संकेत दिले. 2021च्या स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत काही खेळाडूंना करारमुक्त करण्यात येईल तर काहींना संघ व्यवस्थापन विचारपूर्वक खरेदी करू शकेल.
-
सध्या कोणत्या संघाने कोणाला करारमुक्त करावं असा पेच असतानाच समालोचक आकाश चोप्रा याने मात्र चेन्नईने कोणाला संघाबाहेर करावं याची एक यादीच दिली आहे.
-
आकाश चोप्राने चेन्नईच्या संघातून थेट महेंद्रसिंग धोनी याला बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे. धोनीची कामगिरी फारशी चांगली न झाल्याने त्याने असा सल्ला दिला आहेत. याचसोबत इतरही काही खेळाडूंना संघाबाहेर करायला हवं असं आकाशचं मत आहे. पाहूया ते खेळाडू…
-
"शेन वॉटसन सर्व प्रकारच्या स्पर्धांतून निवृत्त झाला आहेच. पण यदा कदाचित त्याचा निर्णय बदलला तरीही CSKने त्याला करारमुक्त करावे"
-
"इम्रान ताहीर IPL मधून निवृत्त न झाल्यास चेन्नईने त्याला बाहेर करावे"
-
"यंदाच्या हंगामात टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केदार जाधवला संघाने बाहेरचा रस्ता दाखवावा"
-
"कामगिरीत सातत्य नसलेल्या मुरली विजयला संघाने करारमुक्त केलं तर त्यात फारसं आश्चर्य वाटायला नको"
-
याशिवाय गोलंदाजीत महागड्या पियुष चावलाबाबतही संघ व्यवस्थापनाने निर्णय घ्यायला हकरत नाही"
-
"तसेच, मोनु सिंगला देखील खराब कामगिरी केल्याने संघाबाहेर करायला हवं", असं आकाश चोप्राने म्हंटलं आहे.
“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस