Rohit Sharma House : भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ असलेला हिटमॅन रोहित शर्मा सध्या कोट्यवधींचा मालक आहे. पण एकवेळ तो आर्थिक तंगीमध्ये होता. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रोहित शर्मा बोरिवलीत राहणाऱ्या आजी-आजोबा, काका-काकूंकडे लहानाचा मोठा झालाय. रोहित सध्या आलिशान घरात राहतोय. पाहूयात वरळीतील रोहित शर्माचं आलिशान घर…. रोहित शर्माचं हे आलिशान घर वरळीतील आहूजा अपार्टमेंट्समध्ये आहे. २०१५ मध्ये रितिका सजदेह हिच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर रोहित शर्मानं ३० कोटी रुपयांना वरळीतील हे घर खरेदी केलं होतं. लग्नानंतर रोहित शर्मा या घरामध्ये राहण्यासाठी गेला. २९ मजली असलेल्या आहूजा अपार्टमेंट्समधीलं सर्व फ्लॅट लग्जरी आहेत. रोहित शर्माचा फ्लॅट सहा हजार स्क्वेअर फूट आहे. रोहित शर्मा आणि रितिकाच्या या फ्लॅटमधील इंटीरियर सिंगापूरमधील पालमर अॅण्ड टर्नर आर्किटेक्ट्स यांनी डिजाइन केलं आहे. रोहित शर्माच्या या आलिशान घरातून वरळी सी लिंकचा जबरदस्त नजराना दिसतो. बाल्कनीमध्ये रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसोबत क्वालिटी टाइम घालवाता अनेकदा दिसला आहे. रोहित शर्माच्या फोटोंमधून आलिशान घराची झलक अनेकदा पाहायला मिळते. रोहित शर्माची आई आंध्र प्रदेश विशाखापट्टणमची आहे. तेलगू ही रोहितच्या आईची मातृभाषा आहे. आईकडून तो तेलगू भाषा शिकला आहे. रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकांची नोंद आहे. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात रोहितने पहिल्यांदा शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने १०६ धावा केल्या होत्या. यानंतर २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा, २०१८ साली विंडीज आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे १११ आणि १०० धावांची खेळी केली होती. कोलकात्याच्या मैदानात रोहित शर्माने लंकन गोलंदाजांची धुलाई करताना १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने २६४ धावा कुटल्या होत्या. वन-डे क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वोत्तम धावसंख्या मानली जाते. या खेळीत रोहितने १८६ धावा या नुसत्या चौकारांवर वसुल केल्या होत्या. आयपीएलमध्ये ६ विजेतेपद जिंकणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. २००९ साली डेक्कन चार्जर्स संघाकडून एकदा तर २०१३, २०१५, २०१७ , २०१९ आणि २०२० या चार वर्षांत मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने ५ शतकं झळकावली होती. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. ५ शतकांच्या सहाय्याने रोहितने या स्पर्धेत ६४८ धावा केल्या होत्या. Photos: Ahuja Apartments , rohit shamara, Ritika Sajdeh Social Media
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का