-
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. (सर्व फोटो – Mumbai Indians Twitter)
-
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील लढतीने ९ एप्रिलपासून ‘आयपीएल’ला प्रारंभ होणार आहे.
-
सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ चेन्नईत दाखल झाला आहे.
-
मुंबई इंडियन्स ट्विटरवरुन खेळांडूसंबंधी अपडेट देत फोटो शेअर करत असते.
-
यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळांडूंचं फोटोशूट शेअर केलं आहे.
-
यामध्ये खेळाडू नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत.
-
नुकतीच मुंबई इंडियन्सने या जर्सीचं अनावरण केलं होतं.
-
मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून या जर्सीचा व्हि़डिओ शेअर करण्यात आला होता.
-
मुंबईने नव्या जर्सीत रंगांच्या बाबतीत काही बदल आहेत. निळा आणि सोनेरी छटा असलेली ही जर्सी चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
-
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मागील हंगामात त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवले होते. इतर कोणतीही संघ त्यांची बरोबरी करू शकलेला नाही.
-
चेन्नई सुपरकिंग्ज या यादीत दुसर्या स्थानावर असून त्यांनी तीनवेळा जेतेपद जिंकले आहे.
-
मुंबईच्या संघात रोहित शर्मा, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत.

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…