भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. लग्न होण्यापूर्वीही विराटला अनेक मुलींनी प्रपोज केल्याचे आपण ऐकले आहे. पाकिस्तानातूनही विराटला फार प्रेम मिळते. पण, पाकिस्तान संघातून खेळणाऱ्या एका क्रिकेटपटूच्या पत्नीलाही फलंदाज म्हणून विराट कोहली आवडतो. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी शामिया आरझू ही भारतीय कर्णधार विराट कोहलीचीही चाहती आहे. शामियाने इन्स्टाग्रामवर एका चाहत्याच्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान हा खुलासा केला आहे. 'तुमचा आवडता गोलंदाज हसन अली असेल, पण आवडता फलंदाज कोण आहे?', असे एका चाहत्याने शामियाला इंस्टाग्रामवर विचारले. यावर शामियाने भारतीय कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे. शामियाचे कुटुंब हरयाणाचे आहे, परंतु सध्या तिचे कुटुंब नवी दिल्ली येथे स्थायिक आहे. हसन अली आणि शामियाचे २०१९मध्ये लग्न झाले. शामिया आरझूने एरोनॉटिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हसन अलीच्या म्हणण्यानुसार, शामियाशी त्याची पहिली भेट एका डिनर दरम्यान होती. मैत्रीनंतर हसन अलीने शामियाला प्रपोज केले. हसन अलीने पाकिस्तानकडून आतापर्यंत १३ कसोटी, ५४ वनडे आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०१७मध्ये पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, यात हसनने शानदार प्रदर्शन केले होते.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…