-
आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधत भारतीय क्रिकेटर मुरली विजय याची पत्नी निकिता विजयने हीने योगाभ्यास केला. याबाबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo- Nikita Instagram)
-
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निकिताने योगासनांचे फोटो शेअर केले आहेत. शीर्षासन केल्याचा फोटो तिने इंस्टाग्रामवर टाकला आहे. (Photo- Nikita Instagram)
-
"योग एक अभ्यास आहे. त्यात आपण शरीराच्या माध्यमातून आपल्या आत्म्याशी संपर्कात येतो. यामुळे बुद्धिला चालना मिळण्यास मदत होते. या आज आणि रोज आपण योगा करूया", असा संदेश तिने दिला आहे. (Photo- Nikita Instagram)
-
निकिताने एका कपड्याचा आधार घेत काही योगासनं केली. सहजतेने ती ही आसनं करत असल्याचं दिसत आहे. (Photo- Nikita Instagram)
निकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. दिनेश कार्तिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने मुरली विजयसोबत विवाह केला होता. (Photo- Nikita Instagram)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल