-
युरो कप आणि कोपा अमेरिकन चषकामुळे जगभरात फुटबॉल प्रेमाला भरते आले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरातही कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेनिमित्त काहीसा असाच उत्साह दिसून आला.
-
रविवारी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-० अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. पण, या स्पर्धेच्या काळात कोल्हापूरातील भिंती मेस्सी आणि नेमारने रंगून गेल्या.
-
कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमी खंडोबा तालीम मंडळाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या भिंतीवर कोपा अमेरिका स्पर्धाच उतरवली.
-
शहरातील विविध भिंतीवर सामन्यादरम्यानची चित्रे रेखाटण्यात आली. यात फुटबॉलपटू मेस्सीसह इतर खेळाडूही चितारण्यात आले आहेत. फुटबॉल प्रेमींसाठी यंदाचा कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामना खास होता. अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकमेकांविरोधात खेळताना फुटबॉल चाहत्यांना बघायला मिळाले. या सामन्यात मेस्सी आणि नेमार हे २ फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानावर उतरले होते.
-
कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली जाईल, असं बोललं जात होतं. अंदाजाप्रमाणे मैदानात दोन्ही संघामध्ये कडवा प्रतिकार बघायला मिळाला.
-
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली.
-
दोन्हीकडून तोडूस तोड प्रतिकार केला जात असल्यानं कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आलं नाही. पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई