-
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता फक्त भारतात नाही, तर भारता बाहेरही आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये विराट पाहिजे होता अशी इच्छा काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचं चित्र दिसत आहे.
पाकिस्तानी संघ हा इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघातील ७ सदस्यांना करोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांची संपूर्ण टीम ही जणू काही बदलली. त्या नव्या टीमने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या मदतीला विराट कोहली धावून आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (Photo Credit : Saud Shakeel Twitter) पाकिस्तानी क्रिकेटपटू शकिल हा २५ वर्षाचा आहे. शकिलने आता पर्यंत फक्त २ वेळा पाकिस्तानकडून वन डे सामना खेळला आहे. तरी देखील तो चर्चेत आहे. याच कारण म्हणजे शकिल हा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सारखा दिसतो. (Photo Credit : Saud Shakeel Twitter) -
इंग्लंड विरोधात दुसऱ्या सामन्यात शकिलने ७७ चेंडूनमध्ये ५६ धावांचा खेळ करत पाकिस्तानचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. (Photo Credit : Saud Shakeel Twitter)
-
त्यानंतर सोशल मीडियावर शकिलचे फोटो व्हायरल झाले. एक नेटकरी म्हणाला, 'इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विरोट कोहली पाकिस्तानच्या मदतीला आला.'
-
दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता पाकिस्तानकडे स्वत:चा विराट कोहली आहे.'
-
तिसरा नेटकरी म्हणाला, 'मी एकटाच आहे का ज्याला शकिल विराट कोहली सारखा दिसतो?'
-
एक नेटकरी म्हणाला, 'शकिल हा नवीन विराट आहे.'
-
दुसरा नेटकरी म्हणाला, 'शकिल हेल्मेट घालून विराट कोहली दिसतो.'
-
तिसरा नेटकरी म्हणाला, 'प्रत्येक व्यक्ती फूटबॉल बघण्यात व्यस्त आहे. मात्र, विराट पाकिस्तानच्या मदतीसाठी धावून आला याकडे कोणाचे ही लक्ष गेले नाही.'

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल