-
भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.
-
४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय.
-
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती.
-
तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केल्यानंतर सर्वच स्तरातून भारतीय महिलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
भारतीय महिला खेळाडूंबरोबरच आणखीन एका व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्या व्यक्तीचं नाव आहे , शोर्ड मरिन.
-
शोर्ड मरिन हे भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत.
-
शोर्ड मरिन यांचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
-
सोशल मीडियावर शोर्ड मरिन यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे.
-
शोर्ड मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने केलेल्या कामगिरी लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार देण्याची मागणी नेटीझन्स करत आहेत. हा पुरस्कार प्रशिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सरकारद्वारे दिला जातो.
-
इतकच नाही तर आजच्या विजयानंतर अनेकांनी 'चक दे इंडिया' चित्रपटामध्ये शाहरुख खानने साकारलेल्या कबीर खानशी शोर्ड मरिन यांची तुलना केलीय.
-
शाहरुख चित्रपटात होता तसे शोर्ड मरिने हे खऱ्या आयुष्यातील हिरो असल्याचे फोटो व्हायरल होऊ लागलेत.
-
बरं हे तुलना करण्याचं प्रमाण एवढं आहे की 'चक दे इंडिया' हे शब्द सुद्धा ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आलेत.
-
शाहरुख आणि शोर्ड यांच्या तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होतातय.
-
शाहरुख खानने चित्रपटामध्ये महिला संघाला प्रशिक्षण दिलेलं आणि इतिहास घडवलेला.
-
शाहरुखने घडवलेली पराक्रम शोर्ड मरिन हे प्रत्यक्षात घडवतील असा विश्वास अनेकांना आहे.
-
भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर शोर्डे मरिन यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत असून अनेकजण त्यांचं कौतुक करत आहेत.
-
विशेष म्हणजे शोर्ड यांनीही स्वत: हा वर दिसणारा टीम सोबतचा फोटो ट्विट केलाय. मात्र त्यांनी याला एक मजेदार कॅप्शन दिलीय.
-
“घरी येण्यासाठी मला अजून काही दिवस थांबावे लागेल असे कुटुंबाला कॉल करून सांगतो” अशा कॅप्शनसहीत शोर्ड मरिन यांनी भारतीय महिला संघासोबतचा सेल्फी पोस्ट केलाय.
-
अनेकांना चक दे इंडियामधील कबीर खान शोर्ड मरिन यांच्यामध्ये दिसण्याचं कारण आहे ज्या पद्धतीने भारतीय महिलांनी हा सामना जिंकलाय.
-
सामना सुरु असतानाच अनेकांनी चक दे इंडिया चित्रपट पाहतोय की काय अशा स्वरुपाचे ट्विट केलेले.
-
अर्थात चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे शूट आऊटपर्यंत सामना न जाता शोर्डे मरिन यांच्याकडून हॉकीचे धडे गिरवून मैदानात उतरलेल्या भारतीय महिलांनी त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाचं परतीचं तिकीट निश्चित करत सामना १-० च्या फरकाने जिंकला.
-
शोर्ड मरिन हे मूळचे नेदरलँड्सचे आहेत.
-
शोर्ड हे २००३ पासून वेगवेगळ्या संघांना हॉकीचं प्रशिक्षण देत आहेत. त्यांना कोच म्हणून १८ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
-
शोर्ड हे ४७ वर्षांचे आहेत.
-
मागील तीन वर्षांपासून म्हणजेच २०१८ च्या मध्यापासून ते भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आहेत.
-
२०१७ ते २०१८ दरम्यान शोर्ड मरिन हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक होते.
-
संघाकडून सर्वोच्च यशाची अपेक्षा असेल, तर त्याकरिता संघात कडक अनुशासन पाहिजे. त्यामुळेच सरावात चुका करणाऱ्यांना कडक शिक्षा करणे हे माझे कर्तव्य आहे व त्या पद्धतीनेच मी संघाला मार्गदर्शन करीत आहे, असं एकदा शोर्ड मरिन यांनी भारतीय पुरुष संघासंदर्भात बोलताना सांगितलं होतं.
-
'चक दे इंडिया'मध्ये भारतीय महिला संघाला फारशी आर्थिक मदत न करतात महिला संघाबद्दल आखडता हात घेतला जात असल्याचं दाखवण्यात आलंय.
-
त्यामुळेच कबीर खान हा त्याच्या पॅशनसाठी आणि गमावलेलं नाव पुन्हा कमवण्यासाठी महिलांच्या संघाला प्रशिक्षण देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र या बाबतीत रील आणि रियल लाइफ कबीर खान अगदी वेगळेत.
-
एका वृत्तानुसार शोर्ड मरिन यांना २०१९ साली दर महिन्याला १० हजार डॉलर एवढी रक्कम पगार म्हणून दिली जायची. यामध्ये वाढ झाली नाही असं गृहित धरलं तरी आजच्या डॉलरच्या दरांनुसार शोर्ड मरिन यांना महिन्याला ७ लाख ४३ हजार रुपये पगार दिला जातो.
रोलंट ओल्टमन्स हे आतापर्यंतचे भारतीय संघाचे सर्वात महागडे कोच होते. २०१७ साली ओल्टमन्स यांना दर महिन्याला १५ हजार डॉलर पगार दिला जायचा. (सर्व फोटो : ट्विटर आणि ऑलिम्पिक डॉटकॉमवरुन साभार)

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी! वाचा विभागनिहाय निकाल व टक्केवारी