-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघानं ४१ वर्षानंतर पदक पटकावलं आहे. जर्मनीला ५-४ ने पराभूत करत भारताने कांस्य पदक पटकावलं. या विजयाचे पाकिस्तानमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. (Photo- Hockey India Twitter)
-
भारत आणि पाकिस्तानचं एकेकाळी हॉकीवर वर्चस्व होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांची हॉकीत घसरण झाली. आता भारताने कांस्य पदक पटकावत जोरदार कमबॅक केलं आहे. (Photo- Hockey India Twitter)
-
"५०, ६० आणि ७० च्या दशकात भारत आणि पाकिस्तानचं हॉकीवर वर्चस्व होतं. ४१ वर्षानंतर भारतानं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. भारताच्या विजयानंतर पाकिस्ताननं धडा घेतला पाहीजे. हॉकीत गुंतवणूक आणि विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे", असं पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. (Photo- Hockey India Twitter)
-
यापूर्वी भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता, तेव्हा पाकिस्तानातील नागरिकांनी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. "टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा", असं ट्वीट मुहम्मद कमर उल हकनं केलं होतं. (Photo- Hockey India Twitter)
-
ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० मध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. "४१ वर्षानंतर भारतीय संघाला कांस्य पदक मिळालं आहे", असं ट्वीट पाकिस्तानी पत्रकार शिराज हसन याने केलं आहे. (Photo- Hockey India Twitter)
-
भारताने १९६० ऑलिम्पिक स्पर्धेत रजत, तर १९६८, १९७२ आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. १९८४ ऑलिम्पिकमध्ये भारत पाचव्या स्थानावर होता. १९८८ मध्ये सहाव्या, १९७६, १९९२, २०००, २००४ साली सातव्या क्रमांकावर होता. १९९६ आणि २०१६ मध्ये आठव्या स्थानावर, र२०१२ मध्ये १२ व्या स्थानावर होता. (Photo- Hockey India Twitter)
-
पाकिस्तानी हॉकी संघ यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान हॉकी संघ १८ व्या स्थानावर आहे. सलग दोन ऑलिम्पिक पाकिस्तानी संघ पात्र ठरला नाही. पाकिस्तानने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन सुवर्ण पदक पटकावली आहेत. १९८० पासून पाकिस्तानची हॉकीत घसरण सुरु झाली. १९७० पासून कृत्रिम टर्फवर हॉकी सुरु झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. (Photo- AP)
-
"भारताने हॉकीसाठी ठोस पावलं उचलली. आम्ही अजूनही १९८०च्या दशकात जगत आहोत. आम्ही पुढे विचारच करत नाही", असं पाकिस्तानी पत्रकार फैजान लखानी यांनी लिहिलं आहे. (Photo- Indian Express)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का