-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची मागील सोमवारी भेट घेतली.
-
मोदींनी या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं.
-
या खेळाडूंमध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचाही समावेश होता.
-
मोदींनी शब्द दिलेला त्याप्रमाणे त्यांनी सिंधूला मेडल जिंकून आल्यानंतर आइस्क्रीमची पार्टीही दिली.
-
या भेटीदरम्यान मोदींनी सिंधूच्या कोरियन प्रशिक्षकांसोबतही चर्चा केली. चर्चेदरम्यान मोदींनी सिंधूचे प्रशिक्षक पार्क ताए-सांग यांना अयोध्येला जाण्याचा सल्ला दिला. पण मोदींनी असा सल्ला का दिला यामागे एक खास कारण आहे.
-
सिंधूच्या यशामध्ये पार्क ताए-सांग यांचं मोलाचं योगदान आहे.
-
ऑलिम्पिकच्या आधापासूनच पार्क ताए-सांग यांनी सिंधूची चांगली तयारी करुन घेतील होती.
-
पार्क ताए-सांग हे संपूर्ण ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सिंधूच्या कामगिरीमुळे चर्चेत राहिले.
-
कोर्टच्या बाहेर बसून असणाऱ्या पार्क ताए-सांग यांच्या प्रत्येक हलचालींवर भारतीय क्रिडाप्रेमींचंही लक्ष होतं.
-
टोक्यो ऑलिम्पिकमधील एका सामन्यादरम्यान कोरियन असणाऱ्या पार्क ताए-सांग यांनी हिंदी शब्द वापरल्यानंतर ते पहिल्यांदा चर्चेत आलेले.
-
पार्क ताए-सांग यांनी सिंधूला आराम से असं म्हणत शांतपणे खेळ असा सल्ला दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला.
-
त्यानंतर पार्क ताए-सांग यांनी भारताचा राष्ट्रध्वज पकडून सिंधूच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचा फोटोही चांगलाच चर्चेत होता.
-
पदक जिंकल्यानंतर पार्क ताए-सांग यांनी साजरा केलेला विजयही सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरला होता.
-
पार्क ताए-सांग यांच्या सिंधू सोबतच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो त्यांनी स्वत: सोशल मीडियावरुन शेअर केले होते.
-
सिंधूने पदक जिंकल्यानंतर पार्क ताए-सांग यांनी तिला मारलेल्या मिठीचा फोटो हा गुरु शिष्याच्या यशाचा दाखला म्हणून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेला.
-
सिंधू ऑलिम्पिकचं स्वत:चं दुसरं पदक घेऊन परत आल्यानंतर तिच्या इतका मान सन्मान तिचे गुरु असणाऱ्या पार्क ताए-सांग यांनाही देण्यात आला.
-
भारत सरकारने आयोजित केलेल्या सर्व सत्कार समारंभांना पार्क ताए-सांग हे आवर्जून उपस्थित होते.
-
अनेक मान्यवरांसोबत पार्क ताए-सांग यांनी मंचावर उपस्थिती लावली.
-
सिंधूबरोबरच पार्क ताए-सांग यांचाही सर्वच ठिकाणी सत्कार करण्यात आला.
-
पार्क ताए-सांग यांनीच अनेक सत्कार समारंभांचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेत.
-
अनेक भारतीय नेत्यांसोबत गप्पा मारतानाचे, हसत संवाद साधतानाचे फोटोही पार्क ताए-सांग यांनी शेअर केलेत.
-
पार्क ताए-सांग यांनी या मंचावरुनही आपले अनुभव शेअर केले.
-
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंख्येला राष्ट्रपती भवनामध्ये टोक्यो ऑलिम्पिकमधील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमालाही पार्क ताए-सांग उपस्थित होते. त्यांनीच हा फोटो पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली होती.
-
त्यानंतर १६ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमातही पार्क ताए-सांग उपस्थित होते.
-
पंतप्रधान मोदींनी सिंधूच्या प्रशिक्षकांना कोरिया आणि अयोध्येच्या विशेष संबंधांबद्दल माहिती दिली.
-
चर्चेदरम्यान मोदींनी पार्क ताए-सांग यांनी अयोध्येला नक्कीच भेट दिली पाहिजे असं मत मोदींनी व्यक्त केलं.
-
चर्चेदरम्यान मोदींनी पार्क ताए-सांग यांना तुम्हाला अयोध्येबद्दल काही माहिती आहे का असं विचारलं.
-
पार्क ताए-सांग यांना मोदींनी कोरिया आणि अयोध्येचा खास संबंध असल्याचं सांगितलं.
-
आधी सिंधूची भेट घेतल्यानंतर तिच्या प्रशिक्षकांशी बोलताना मोदींनी सांगितलं की मागील वेळेस कोरियन राष्ट्रपतींची पत्नी किम-जुंग सूक अयोध्येमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला हजर होत्या.
-
खरं तर मोदींनी खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील चर्चेमध्ये सिंधूच्या प्रशिक्षकांना सांगितल्याप्रमाणे अयोध्या आणि कोरियाचा फार घनिष्ट संबंध आहे.
-
अयोध्येचे पौराणिक राजकुमारी सुरीरत्ना ही इसवी सन ४८ मध्ये कोरियाच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे तिने कोरियाचा राजा सुरो याच्यासोबत विवाह केला होता, असं सांगितलं जातं. त्यामुळेच मोदींनी कोरियन प्रशिक्षकांना अयोध्येला नक्की भेट द्या असा सल्ला दिला.
-
सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याआधी पार्क ताए-सांग हे सोशल नेटवर्किंगवर फारसे लोकप्रिय नव्हते.
-
पार्क ताए-सांग यांना इन्स्टाग्रामवर केवळ ३२८ फॉलोअर्स होते.
-
मात्र सिंधूने पदक जिंकल्यानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या १८ हजारांपर्यंत गेलीय.
-
पार्क ताए-सांग हे खऱ्या अर्थाने भारतात एक सेलिब्रिटी झालेत. (सर्व फोटो ट्विटर, इन्स्टाग्राम, एपी, रॉयटर्सवरुन साभार)
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना