-
टोक्यो ऑलिम्पिकमध्य पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला होता.
-
पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ ने जिंकली. त्यामुळे रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
-
रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला होता. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते.
-
कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनाच्या फ्रीस्टाइल प्रकारात इतिहास रचून रौप्य पदक जिंकले. असे करणारा तो देशातील दुसरा कुस्तीपटू ठरला.
-
सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नहरी गाव कुस्तीपटू रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा करीत होते. कारण रवीच्या पदकामुळे गावाचा विकास होईल, अशी त्यांना आशा होती.
-
रवीच्या नाहरी गावातील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी धडपडायला लागते.
-
दिवसभरात दोन तास वीजपुरवठा होतो, त्यात सर्व कामे उरकावी लागतात. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीही योग्य व्यवस्था येथे नाही. गावात फक्त महत्त्वाचे असे एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे.
-
त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास गावचे चित्र पालटू शकेल, असं या गावकऱ्यांना वाटत होते.
-
दरम्यान रवीमुळे गावाचा हळूहळू विकास होत आहे. त्यामुळे गावकरी खूष आहेत.
-
आपल्या गावातील लोकांचा विश्वास खरा ठरवणारा रवी दहिया पुन्हा एकदा चर्चेत आला आला. ते का हे आपण जाणून घेऊया.
-
रवी दहियाचा हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे, तो फोटो पाहून त्याचे चाहते त्याला बाहूबली म्हणत आहेत.
-
क्रिकेटपटू किंवा ऑलिम्पियन, भारतीय खेळाडू त्यांच्या यशानंतर मंदिरात दर्शनासाठी जातात. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर, बरेच खेळाडू अजूनही त्यांच्या यशाचे आभार मानण्यासाठी देवाच्या मंदिरात जात आहेत.
-
ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या रवी दहिया यांनी दोन दिवसांपूर्वी लखनौहून परतताना हरिद्वार स्थित मंदिरात जलाभिषेक केला होता. त्यानंतर त्यांनी सोमवारी जम्मूमध्ये माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले.
-
सोनीपतच्या नहरी गावातील रहिवासी रवी दहिया यांनी रविवारी त्यांच्या गावातील बाबा शंभूनाथ मंदिरात पूजा केली होती.
-
रवी दहिया भगवान शिवशंकराला जलाभिषेक करत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्याची शैली पाहून लोक त्याला खऱ्या आयुष्यातील बाहुबली म्हणत आहेत. (photo- social media, indian express)

७०० नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरले; ७ नक्षल ठार; पत्रक काढणे नक्षलवाद्यांच्या अंगलट; चकमक सुरूच