-
भारतीय संघामधील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा सध्या आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये आहे.
-
हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल हे दोघे मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतात.
-
आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी पांड्या बंधू नुकतेच आबू धाबीला पोहचले आहेत.
-
तशी पांड्या बंधूंची मैदानावरील कामगिरीच फार बोलकी असते असं म्हटल्यासं चुकीचं ठरणार नाही.
-
मुंबई इंडियन्सच्या संघातील आघाडीचे खेळाडू म्हणून या दोघांकडं पाहिलं जातं.
-
मुंबईने आयपीएल चषक जिंकण्यामध्ये या दोघांचाही मोलाचा वाटा आहे.
-
लेट्स बॅट डू द टॉकिंग पद्धतीने पांड्या मैदानात उतरल्यावर खेळतात.
-
अर्थात आयपीएलप्रमाणेच ते भारतीय संघात खेळतानाही आपल्या कामगिरीची छाप सोडतात.
-
सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये दोन्ही पांड्या बंधूंचा समावेश होतो.
-
लहानपणापासूनच या दोघांनी भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
-
एकेकाळी हार्दीक आणि त्याच्या भावाने मॅगी खाऊन दिवस काढलेत. मात्र आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघामध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण करत आतापर्यंत यशस्वी वाटचाल केलीय.
-
मैदानाबाहेर पांड्या हे त्यांच्या लाइफ स्टाइलसाठी ओळखले जातात.
-
तसे पांड्या बंधू आणि त्यातही खास करुन हार्दिक हा त्याच्या लाईफस्टाइलसाठी आणि फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो.
-
हार्दीकला आलिशान गोष्टींचा फार शौक आहे.
-
अगदी महागड्या ब्रॅण्डच्या कपड्यांपासून ते गाड्यांपर्यंत अनेक गोष्टी हार्दीककडे आहेत.
-
त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून कायमच त्याच्या या आलीशान लाइफ स्टाइलची झलक दिसून येते.
काही आठवड्यांपूर्वीच पांड्या बंधूंनी मुंबईमध्ये एक अल्ट्रा आलिशान आठ बीएचकेचं घर विकत घेता आहे. -
समोर आलेल्या माहितीनुसार या बंगल्याची अंदाजित किंमत ३० कोटींच्या आसपास आहे.
-
पांड्या बंधूंचं हे घर ३८३८ स्वेअर फुटांचं आहे.
-
सध्या हार्दीक चर्चेत आहे तो त्याच्या अशाच एका आलिशान गोष्टीमुळे म्हणजेच त्याच्या महागड्या खरं तर अती महागड्या घड्याळामुळे.
-
युएईमध्ये नुकताच हार्दीक रोल्स रॉयल कालिननमध्ये दिसून आला.
-
त्याने गाडीमध्ये बसून काढलेले काही सेल्फी पोस्ट केलेत.
-
हार्दीक टँक टॉप, टोपी आणि चष्मा अशा कूल लूकमध्ये दिसून आला.
-
सध्या हार्दीक युएईमध्ये भटकंती करतोय, असं या फोटोंमधून दिसून येत आहे,
-
त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यावेळी काढलेले काही फोटो शेअर केलेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चा त्याच्या घड्याळाची आहे.
-
हार्दीकचं घड्याळ हे पाटेक फिलिक कंपनीचं असून या मॉडेलचं नाव आहे, नॉटिलस प्लॅटिनम ५७११.
-
या घड्याळाचं वैशिष्ट्य म्हणजे घड्याळामध्ये हिरव्या रंगाचे पाचू आहेत. घड्याळ पूर्णपणे प्लॅटिनमने बनवण्यात आलं आहे.
-
हे घड्याळ सेल्फ-वाइण्डींग ऑटोमॅटिक मूव्हमेंटच्या फिचरसहीत येतं. या घड्याळामध्ये ४५ तासांची बॅटरी टिकू शकते.
-
प्लॅटिनम ५७११ ची ही घड्याळांची रेंज फारच दुर्मिळ असून त्यात हिरवा रंग हा अगदीच क्वचित पहायला मिळतो.
हार्दीकच्या या घड्याळाची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे. (सर्व फोटो हार्दीक पांड्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल