-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करुन पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने लॉर्ड्सनंतर ओव्हल कसोटीमध्येही इंग्लंडला पराभूत करत मालिकेत २-१ ची आघाडी मिळवली आहे.
-
कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने विजयासाठी आवश्यक असणाऱ्या दहा विकेट्स मिळवत इंग्लंडच्या संपूर्ण संघाला २१० धावांमध्ये तंबूचा रस्ता दाखावला. भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला.
-
या विजयासोबत भारताने बरेच विक्रम आपल्या नावे केलेत. याच विक्रमांवर टाकलेली नजर.
-
भारताने ५० वर्ष १३ दिवसानंतर ओव्हलमध्ये कसोटी सामना जिंकलाय. मागील वेळेस २४ ऑगस्ट १९७१ रोजी भारताने या मैदानात विजय मिळवला होता. हा सामना भारताने ४ गडी राखून जिंकलेला. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती. तसाच पराक्रम विराटच्या सेनेनं सोमवारी केला.
-
विराट कोहली हा आशियातील देशांमधील सर्व कर्णधारांपैकी एकमेव असा कर्णधार आहे ज्याने इंग्लंडला त्यांच्याच मैदानात एकदा दोनदा नाही तर तिनदा पराभूत केलं आहे.
-
दोन सामने विराटच्या नेतृत्वामध्ये याच मालिकेत जिंकलेत तर यापूर्वी २०१८ साली केलेल्या दौऱ्यात विराटच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवलेला.
-
इतकच नाही तर विराट हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये एकाहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलाय.
-
सोमवारचा सामना हा भारताने इंग्लंडमध्ये जिंकलेला नववा कसोटी सामना ठरला.
-
भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजमध्ये प्रत्येकी नऊ कसोटी सामने जिंकलेत.
कसोटीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये २०० हून कमी धावा करुनही इंग्लंडविरोधात सामना जिंकण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. -
एकूण पाहिल्यास भारताने असा पराक्रम करण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी विराटच्या नेतृत्वाखालीच हा चमत्कार केलेला.
-
२०१८ साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर वडर्स कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताचा संघ १८७ धावांमध्ये तंबूत परतलेला. तरीही भारताने हा सामना ६३ धावांनी जिंकलेला.
-
कर्णधार म्हणून विराटने मिळवलेला २० वा असा कसोटी विजय आहे ज्यात भारताने सामना १५० पेक्षा अधिक धावांनी जिंकलाय.
-
१५० पेक्षा अधिक धावांनी संघाला २० वेळा विजय मिळवून देणारा विराट हा एकमेव कर्णधार असून हा एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम रिकी पॉण्टींगच्या नावे होता. त्याने १८ वेळा आपल्या ऑस्ट्रेलियन संघाला असा विजय मिळवून दिलेला.
-
आता पाचवा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये १० तारखेपासून सुरु होणार आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल