-
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक करत १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले.
-
या विजयानंतर भारतीय संघासोबतच भारतीय कर्णधार विराट कोहलीचीही सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. अर्थात खेळातील सातत्य आणि नेतृत्व गुणांचं कौतुक होण्याबरोबरच विराटने विजयानंतर केलेलं खास तुतरी सेलिब्रेशन सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
-
विराटच्या या तुतारी सेलिब्रेशनवरुन दोन गट पडल्याचं चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे. विशेष म्हणजे सामन्यातील विजयानंतर विराटने केलेल्या या सेलिब्रेशनमुळे ब्रिटीश प्रसारमाध्यमांचा फारच जळफळाट झाल्याचं चित्र दिसतंय.
-
मात्र विराटवर त्याच्या या सेलिब्रेशनवरुन टीका करणाऱ्या ब्रिटीश प्रसारमाध्यमांना भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने जबरदस्त उत्तर दिलंय.
-
शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
-
या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत.
-
१३ कसोटी सामन्यांपैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवला होता.
-
या विजयानंतर भारतीय संघाने ओव्हल मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केलं. मात्र विराटचं सेलिब्रेशन खास चर्चेत आहे.
-
कर्णधार विराट कोहली हा तसा मैदानात खेळाचा पुरेपूर आनंद घेत असतो.
-
विराट मैदानावर असताना नेहमीच उत्साहात असतो.
-
प्रतिस्पर्धी संघाची विकेट गेल्यानंतर इतर खेळाडूंपेक्षा विराटच जास्त चार्च्डअप होताना दिसतो.
-
कधी विराट फिल्डींग लावताना कॅमेरामध्ये कैद होतो.
-
तर कधी तो एखादा क्लासिक शॉर्ट मारताना कॅमेराच्या लेन्समध्ये टीपला जातो.
-
विराट मैदानात असला की सतत त्याच्यावर नजर असते मग तो फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण.
-
विराटलाही याची पूर्ण जाणीव असते. मात्र यामुळे तो कधी स्वत:ला रोखुन न धरता मुक्तपणे व्यक्त होत असतो. कधी अभिवादन करुन तर कधी आरडाओरड करुन.
-
विराट बऱ्याचदा विरोधी संघाला समर्थन करणाऱ्या चाहत्यांना देखील आपल्या कृतीमधून भन्नाट उत्तरं देतो.
-
तसंच काहीसं विराटने भारताने ओव्हलवर इंग्लंडवर विजय मिळल्यानंतर केलं.
-
कोहलीने इंग्लंडच्या बार्मी आर्मीला तुतारी स्टाइल सेलिब्रेशन करुन ट्रोल केले.
-
विराटने विजयानंतर तुतारी वाजवण्याची नक्कल करत इंग्लिश चाहत्यांना ट्रोल केलं.
-
यानंतर, सोशल मीडियावर विराटच्या या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
कोणी कोहलीच्या बाजूने तर काहीजण त्याच्या विरोधात ट्विट करताना दिसले.
-
इंग्लंडच्या पराभवानंतर ज्या प्रकारे कोहलीने बार्मी आर्मीला लक्ष्य करून विजय साजरा केला, त्यावरून अनेक इंग्लंड चाहते आणि क्रिडाप्रेमींनी कोहलीला लक्ष्य केले आहे.
-
खरं तर बर्मी आर्मी म्हणजेच ब्रिटीश आर्मीच्या संकल्पनेनुसार इंग्लंडचा संघ जिथे जिथे खेळतो तिथे त्यांना समर्थन करायला चाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांचा गट आहे. हे चाहते तोंडाने फुंकर मारुन वाजवायचे वाद्य वापरुन आपला आनंद साजरा करत असतात. प्रतिस्पर्धांच्या विकेट गेली, इंग्लंडने चौकार, षटकार लगावला की हे लोकं सेलिब्रेशन सुरु करतात.
-
मात्र विराटने विजयानंतर या चाहत्यांना तुतरीसारखी बोट दाखवून ती वाजवण्याची नक्कल करत डिवचलं. तुम्ही बसा पिपाण्या वाजवत आम्ही इथे सामना जिंकलोय असंच विराटला यामधून सांगण्याचा प्रयत्न होता.
-
कोहलीला असं सेलिब्रेशन करण्याची गरज नव्हती असं म्हटले आहे. तर अनेक लोक कोहलीच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत.
-
तसं विराटचं हे सिलिब्रेशनच चुकीचं म्हणता येणार नाही. याच मालिकेमध्ये ब्रिटीश चाहत्यांनी एकदा के. एल. राहुलवर बाटल्या फेकल्या होत्या तर एकदा सिरजाविरोधात घोषणाबाजी केलेली. त्यामुळे या अशा विरोधकांना झेलण्यासाठी विराटसारखाच हवा असं अनेक भारतीय चाहत्यांचं मत आहे.
-
बार्मी आर्मीनेही आम्हाला माहितीय तुला आमच्यात यायचंय असं म्हणत विराटला उत्तर दिलंय.
-
मात्र फॉक्स क्रिकेट या ब्रिटीश मीडियाने कोहलीचं हे सेलिब्रेशन क्लासलेस असल्याची टोकाची टीका केलीय. म्हणजेच विराटही ही कृती दर्जाहीन असल्याचा ठपका त्यांनी ठेवलाय.
-
या टीकेवरुन विराटचे चाहते फॉक्स क्रिकेटवर तुटून पडलेले असतानाच वसीम जाफरने हेडिंग करेक्शन करण्याचा खोचक टोला फॉक्स क्रिकेटला लगावत त्यांच ट्विट कोट करुन रिट्विट केलंय.
-
हिंमत असणारा कर्णधार : विराट कोहलीच्या संघाने मृतावस्थेमधील सामन्यात जीव ओतला आणि ऐतिहासिक विजय मिळवल्याने जग त्यांना सलाम करतंय, असं हेडिंग करुन घ्यावं असा टोला जाफरने लगावला आहे.
-
जाफरचं हे ट्विट व्हायरल झालं असून त्याला अडीच हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलंय तर २६ हजारहून अधिक जणांनी ते लाईक केलंय. विशेष म्हणजे फॉक्स क्रिकेटच्या ओरिजनल ट्विटला केवळ ६०० च्या आसपास रिट्विट आहेत. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल