-
तशी त्याची ओळख सांगायची झाल्यास माजी क्रिकेटपटू आणि एका आंतरराष्ट्रीय संघाचं नेतृत्व करणारा माजी खेळाडू अशी सांगावी लागेल.
-
सध्या पुन्हा चर्चेत आहे कारण त्याने तब्बल ७० कोटी रुपयांचं घरं खरेदी केलंय.
-
त्याने घेतलेलं घरं हे बॅचलर पॅड म्हणजेच एकट्याने राहण्यासाठीचं घर आहे.
-
इन्स्टाग्रामवर ८ लाख ६३ हजार फॉलोअर्स असणारा हा क्रिकेटपटू घटस्फोटीत आहे.
-
२०२० साली पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तो एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरला डेट करत होता. मात्र त्यांचं नुकतचं ब्रेकअप झालं.
-
त्यामुळेच आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आणि प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो बॅचलर्स लाइफ जगतोय.
-
तो आता बॅचलर्स पॅडमध्ये लवकरच शिफ्ट होणार असला तरी त्याला अधूनमधून सोबत असणार आहे त्याच्या छोट्या मुलीची.
-
मगासपासून आपण ज्या माजी क्रिकेटपटूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे मायकल क्लार्क.
-
क्लार्कने नुकतच ऑस्ट्रेलियामध्ये एक घर १३ मिलियन डॉलर्स म्हणजेच ७० कोटींना विकत घेतलं आहे.
-
एका लिलावामध्ये क्लार्कने फाइव्ह बीएचकेचं हे बॅचलर पॅड विकत घेतलं आहे.
-
क्लार्कच्या नव्या घरामध्ये पाच मोठ्या आकाराच्या रुम असून हे घर पूर्णपणे युरोपियन स्टाइलने बनवण्यात आलं आहे.
-
दोन वर्षांपूर्वी कॅनडामधील फिलिप आणि एनेट जॉन्सटन यांनी ९.५ मिलियन डॉलरला हे घर विकत घेतलं होतं. आता लिलावामध्ये क्लार्कने हे घर विकत घेत त्याचा मालकी हक्क मिळवलाय.
-
क्लार्कचं नवीन घर हे फिट्जविलियम मेन्शनपासून केवळ एक घर सोडून आहे.
-
फिट्जविलियम मेन्शन हा क्लार्कचा जुना पत्ता आहे. त्या घरामध्ये तो त्याची पूर्वाश्रमीची पत्नी काइलीसोबत राहत होता.
-
क्लार्क आणि काइलीने ते घर फेब्रुवारीमध्ये १२ मिलियन डॉलर्सला विकलं.
-
क्लार्क आणि काइली २०१४ पासून २०१९ पर्यंत त्या घरामध्ये राहत होते.
-
२०१४ मध्ये क्लार्क आणि काइलीने ते घर ८.३ मिलियन डॉलर्सला विकत घेतलं होतं.
-
क्लार्क आणि काइलीला २०१५ साली कन्यारत्न प्राप्ती झाली.
-
हे दोघेही पालक म्हणून अगदी उत्तम कपल होतं असं त्यांच्या फोटोंमधून आणि आता घटस्फोटानंतर ते ज्या पद्धतीने मुलीचा संभाळ करतात त्यावरुन दिसून येतं.
-
२०१९ मध्ये क्लार्क आणि काइली यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ वर्षभर ही प्रक्रिया सुरु होती.
-
क्लार्क आणि काइलीने विभक्त होण्याचा निर्णय नक्की काय घेतला याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलं नाही.
-
क्लार्क आणि काइली हे २०१२ पासून एकत्र होतं. १८ महिने ते एकमेकांना डेट करत होते.
-
क्लार्क आणि काइली यांनी सात वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
-
क्लार्क आणि काइली हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट सर्कलमधील एक नावाजलेलं कपल म्हणून ओळखलं जायचं.
-
क्लार्कने क्रिकेटमध्ये नाव कमावलं तर कायइलीही तिच्या क्षेत्रामध्ये नावाजलेलं व्यक्तीमत्व आहे.
-
काइली ही आधी प्रोफेश्नल मॉडेल होती आणि नंतर तिने अभिनय क्षेत्रातही काम केलं आहे.
-
काइली ही तिच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमुळे कायमच चर्चेत असते.
-
क्लार्क आणि काइली या दोघांनाही भटकंतीची फार आवड आहे त्यामुळे ते अनेकदा सोशल नेटवर्किंगवर फोटो पोस्ट करायचे.
-
इन्स्टाग्रामवर काइलीचे ६८ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
काइली आणि क्लार्क हे अनेकदा त्यांच्या मुलीसोबतचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट करायचे.
-
क्लार्कने घेतलेलं नवीन घर हे ७८४ स्वेअर मीटर एवढं मोठं आहे.
-
क्लार्कच्या घरामध्ये एक मिनरलाइज्ड गॅस हिटेड टाइल पूलही आहे.
-
यामध्ये दोन आउटडोअर शॉवर आणि भन्नाट इंटीरियर आहे.
-
मोठं ड्रेसिंग रुम, रिडींग रुम, ऐसपैस बाल्कनी आणि त्यामधून नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा समुद्र अशा भन्नाट ठिकाणी क्लार्कचं हे घर आहे.
-
क्लार्कच्या या नवीन घरापासून हाकेच्या अंतरावर अनेक समुद्रकिनारे आहेत.
-
त्याच्या घरामधूनही समुद्राचं सहज दर्शन होतं.
-
याच वर्षाच्या सुरुवातीला क्लार्क आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर पीप एडवर्ड्ससोबत ब्रेकअप झालं आहे.
-
पीप एडवर्ड्स ही ४१ वर्षांची आहे.
-
ऑस्ट्रेलियाबरोबरच जगभरातील फॅशनविश्वात पीप एडवर्ड्स ही एक नावाजलेला चेहरा म्हणून ओळखली जाते.
पीप एडवर्ड्स ही सिडनीमधील बॉण्डी बीच परिसरामध्ये राहते. -
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी अनेकदा क्लार्क आणि एडवर्ड्सला एकत्र कॅमेरात कैद केलंय.
-
मात्र सध्या क्लार्क आणि एडवर्ड्समधील नातं हे कॉम्पिलिकेटेड असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे.
-
असं असतानाच क्लार्कने बॅचलर पॅड विकत घेतल्याने यावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
क्लार्क आणि काइली यांना एक मुलगी आहे.
-
केस्ले असं क्लार्क आणि काइलीच्या मुलीचं नाव आहे.
-
केस्ले ही पाच वर्षांची असून ती आई वडील विभक्त झाल्यानंतर दोघांकडे समान समान दिवस राहते.
-
क्लार्क आणि काइलीने केस्लेची कस्टडी समसमान वाटून घेतलीय.
-
क्लार्क अनेकदा आपल्या मुलीसोबत खेळतानाचे फोटो पोस्ट करत असतो.
-
सध्या क्लार्क बॅचलर्स लाइफ जगत आहे.
-
क्लार्क अनेक अॅक्टीव्हीटी करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करताना दिसतो. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO