-
भारताची तडाखेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज मैदनातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरही कायमच चर्चेत असते.
-
मूळची मुंबईकर असणाऱ्या जेमिमा सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून मैदानाबरोबरच या डिजीटल माध्यमावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
-
मागील महिन्यामध्ये पार पडलेल्या द हण्ड्रेड या इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पर्वामध्ये जेमिमाने तुफान फटकेबाजी केली.
-
या स्पर्धेत नॉर्दन सुपरचार्जर्सच्या संघाकडून खेळताना जेमिमाने आपल्या फलंदाजीमुळे चाहत्यांची मनं जिंकून घेतली.
-
ब्रिटीश प्रसारमाध्यमांनाही जेमिमाच्या या तुफान खेळीची दखल घेतल्याचं पहायला मिळालं.
-
मात्र सध्या जेमिमा ही खेळासाठी चर्चेत नसून तिच्या एका पोस्टमुळे तुफान चर्चेत आहे.
-
जेमिमा सोशल नेटवर्किंगवरुन खास करुन इन्स्टाग्रामवरुन अनेक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतेच जेमिमाने स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
झालं असं की जेमिमाने ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलॅण्ड येथील एका हॉटेलमधील स्विमिंगपूलमधले स्वत:चे दोन फोटो पोस्ट केले आहेत.
-
स्विमिंग पूल, समुद्रकिनारा आणि नारळाची झाडं असे इमोजी वापरत तिने हे फोटो शेअर केलेत.
-
जेमिमाच्या या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं आहे ते तिच्या फिटनेसमुळे.
-
मैदानामध्ये गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या जेमिमाच्या फोटोंमध्ये तिचे अॅब्स स्पष्टपणे दिसत असून अनेकांनी तिच्या या अॅब्सचं कौतुक केलं आहे.
-
विशेष म्हणजे जेमिमाने शेअर केलेल्या या फोटोंवर भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेशनेही कमेंट केलीय.
-
भारताचा हॉकीपटू युवराज वाल्मिकीनेही या फोटोवर कमेंट केली आहे.
-
मात्र युवराजच्या कमेंटला जेमिमाने रिप्लाय दिला नाहीय.
-
टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवत आपल्या देशाचे नाव उंच करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असणारा हॉकीपटू पीआर श्रीजेशने, “सिक्स पॅक्स कमिंग सून” अशी कमेंट केलीय.
-
श्रीजेशच्या या कमेंटवर २१ वर्षीय जेमिमानेही रिप्लाय दिलाय.
-
आपण सिक्स पॅक्सवर काम करायचा प्रयत्न करतोय असं जेमिमाने श्रीजेशला सांगितलं आहे. यावेळी कमेंट करताना तिने श्रीजेशचा उल्लेख अण्णा म्हणजेच मोठा भाऊ या अर्थाने केलाय. तिच्या या कमेंटला ३०० हून अधिक लाइक्स आहेत. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल