-
महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे ड्वेन ब्राव्हो. सध्या ब्राव्हो आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी करत असून त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा वेस्ट इंडियन खेळाडू आपल्या खेळाबरोबरच त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यामध्ये ब्राव्होचं स्थान आघाडीवर आहे.
-
अगदी त्याच्या सेलिब्रेशनच्या डान्सपासून ते कामगिरीपर्यंत सर्वच गोष्टींने तो इतरांचं लक्ष वेधून घेतो.
-
ब्राव्होप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचा संघ सहकारी आणि मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा कायरन पोलार्ड कामगिरीही कायमच चर्चेचा विषय ठरते.
-
या दोघांनी वेस्ट इंडिजच्या संघाला अनेकदा भन्नाट विजय मिळवून देताना कमाल कामगिरी केलीय. सध्या ते आयपीएल गाजवत आहेत.
-
मात्र आयपीएल गाजवणाऱ्या या दोघांमधील एक संवाद सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.
-
दोघांमधील हा संवाद पाहून त्यांच्या चाहत्यांना हसू अनावर झाल्याचं चित्र इंटरनेटवर पहायला मिळत आहे.
-
ब्राव्हो आणि पोलार्डमधील संवादाला कारण ठरलं आहेत त्यांची मुलं.
-
तसे हे दोघे एकमेकांना मैदानामध्ये फार खुन्नस देताना दिसतात.
-
म्हणजे एकाने दुसऱ्या बाद केलं की मुद्दाम सेलिब्रेशन करतच डिवचणं वगैरे असे प्रकार क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा पाहिलेत.
-
पण यंदा प्रकरण थेट दोस्ती को रिस्तेदारी मे बदलते है वालं आहे असं मस्करीमध्ये म्हणता येईल.
-
झालं असं की, ब्राव्होने त्याचा मुलगा डीजे ब्राव्हो ज्युनियरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही फोटो पोस्ट केले होते.
-
आजचा दिवस तुझा आहे. तुझे बाबा तुझ्यावर फार प्रेम करतात, असं ब्राव्होने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.
-
तसेच तू आठ वर्षांचा झाला असून तुला वाढदिवसानिमित्त खूप सारे केक आणि आईस्क्रीम मिळो असंही ब्राव्हो मुलाला शुभेच्छा देताना म्हणाला.
-
या पोस्टवर कायरन पोलार्डने कमेंट करत हॅपी बर्थ डे यंग ब्राव्हो असं म्हटलं.
-
त्यावर लगेच ड्वेन ब्राव्होने कमेंट करत, तो तुझा जावई आहे अशी कमेंट केली. यामध्ये त्याने स्मायलीजचाही वापर केला.
-
पोलार्डला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत.
-
अनेकदा पोलार्डचे कुटुंबीय आयपीएल सामन्यांदरम्यान मुंबईच्या डगआऊटमध्ये दिसून येतात.
-
ड्वेन ब्राव्होच्या या कमेंटवरुन मग पोलार्डनेही त्याला भन्नाट रिप्लाय देत चारचौघांमध्ये त्याची फिरकी घेतली.
-
स्वप्न पहायचं सोडून दे, तू एवढ्या उशीरा का झोपतोस रोज?, असा उपहासात्मक टोला पोलार्डने ब्राव्होला लगावला. म्हणजेच तुझा मुलगा माझा जावई होईल हे स्वप्न आहे असं यामधून पोलार्डला सुचित करायचं होतं.
-
या दोघांमधील संवादाने नेटकऱ्यांना चर्चेला विषय दिला हे मात्र नक्की. (सर्व फोटो : सोशल नेटवर्किंग, आयपीएल आणि आयसीसीकडून साभार)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?