-
आयपीएल २०२१च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सहज फडशा पाडत विजय मिळवला. पंजाबचा कप्तान केएल राहुलने ९८ धावांची स्फोटक खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला.
-
राहुल सामन्यात स्टार ठरला असला, तरी सामन्यानंतर धोनीसेनेच्या खेळाडूने भर मैदानात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
-
चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.
-
सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले.
-
दीपकची ही गोष्ट पाहून त्याची गर्लफ्रेंड खूश झाली आणि तिने दीपकला होकार दिला.
-
दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत आहे.
-
पण दीपकची ही प्रेयसी नक्की कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
-
दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज असे आहे.
-
जया ही प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे.
-
सिद्धार्थ बिग बॉस आणि एमटीव्हीवरील प्रसिद्ध स्प्लिट व्हिला या शोमध्ये झळकला होता.
-
जया आणि दीपक गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
यंदाच्या आयपीएलमधील अनेक सामन्यात ती स्टँड्समध्ये बसून सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाली.
-
जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे.
-
ती सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते.
-
जया ही मूळची दिल्लीची असल्याचे बोललं जात आहे.
-
सध्या ती दीपकला सामन्यादरम्यान प्रोत्साहन देण्यासाठी दुबईला गेली आहे.
-
दीपकने जयाला प्रपोज केल्यानंतर तिचा भाऊ सिद्धार्थनेही तिचे अभिनंदन केले.
-
तर दुसरीकडे दीपक चहरची बहीण मालती चहर हिनेही My Brother is taken अशी कमेंट त्यांच्या फोटोवर केली आहे.
-
दीपक चहरची बहीण मालती ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
-
मालतीने जया आणि दीपकचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत जया ही भारतीय असून तिला कोणीही परदेशातील समजू नये, असेही मालतीने सांगितले आहे.
-
गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.
-
दरम्यान दीपक आणि जया आयपीएल २०२१ नंतर घरी परतताच लग्न करू शकतात, असे बोललं जात आहे.
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच