-
चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने १६ सामन्यात एकूण ६३५ धावा केल्या. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याचा ऑरेंज कॅप देऊन सन्मान करण्यात आला आहे. (Photo- IPL/Twitter)
-
चेन्नईकडून खेळणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसची ऑरेंज कॅप अवघ्या २ धावांनी हुकली. ड्युप्लेसिसनं १६ सामन्यात एकूण ६३३ धावा केल्या. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- BCCI)
-
पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने १३ सामन्यात ६२६ धावांची खेळी केली. पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. साखळी फेरीतचं पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं. राहुलने ६ अर्धशतकं झळकावली (Photo- IPL/Twitter)
-
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शिखर धवनने ५८७ धावांची खेळी केली. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरल्याने आयपीएल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. (Photo- IPL/Twitter)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने एकूण १५ सामन्यातील १४ डावात ५१३ धावा केल्या. (Photo- IPL/Twitter)
-
राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने एकूण ४८४ धावा केल्या. १ शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- IPL/Twitter)
-
दिल्लीकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने १५ सामन्यात एकूण ४७९ धावा केल्या. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo-PTI)
-
कोलकात्याचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. या सामन्यात शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं. शुभमन गिलने १७ सामन्यात एकूण ४७८ धावा केल्या (Photo- IPL/Twitter)
-
पंजाबच्या मयंक अग्रवालने १२ सामन्यात एकूण ४४१ धाावांची खेळी केली. यात नाबाद ९९ ही सर्वोत्तम खेळी आहे. (Photo- IPL/Twitter)
-
ऋषभ पंतने एकूण १६ सामन्यात ४१९ धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo-PTI)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख