-
वर्षाचे महिने, महिन्यातील आठवडे, आठवड्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिटे आणि मिनिटांचे सेकंद उलटले; तरी गेल्या ७४ वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटलढतींचे औत्सुक्य मात्र टिकून आहे.
-
भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे गेल्या काही वर्षांत उभय संघांमधील सामन्यांची संख्या रोडवली आहे; परंतु ‘आयसीसी’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी दुबईत हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
-
टी-२० या क्रिकेट प्रकारात विजयाचे अंतर बऱ्याचदा निसटते असते. त्यामुळेच कोणताही संघ अनपेक्षितपणे बाजी पलटवू शकतो. टी-२० क्रिकेटमधील आणि या प्रकारातील विश्वचषकाच्या आकडेवारीत भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे, हेच २००७च्या पहिल्या विश्वचषकापासून सिद्ध झाले आहे.
-
भारताने सर्व सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाबर आझमच्या पाकिस्तान संघाशी सामना करणार आहे. त्यामुळे प्रक्षेपणकर्ते, चाहते, जाहिरातदार आदी घटकांनी या सामन्याची चर्चा रंगात आणली आहे.
-
भारत पाकिस्तान सामन्यामध्ये काही खेळाडूंची थेट जुगलबंदी पहायला मिळणार आहे. याच अशा पाच भारत पाकिस्तानच्या खेळाडूंच्या जोड्या आणि त्यांच्यात कसा संघर्ष रंगेल हे पाहूयात…
-
१) के. एल. राहुल विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी – के. एल. राहुल सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वोच्च स्थानी म्हणजेच फॉर्ममध्ये आहे.
-
के. एल. राहुलने टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय सामने या सर्वच प्रकारांमध्ये खोऱ्याने धावा ओढल्यात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
मात्र असं असलं तरी राहुलसमोर शाहीन आफ्रिदीचं आव्हान असणार आहे.
-
पॉवर प्ले दरम्यान भन्नाट गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाहीन आफ्रिदीला खेळून काढण्याचं आव्हान राहुल समोर असेल.
-
आफ्रिदीचा स्वींग भन्नाट असून डावाच्या सुरुवातीलाच गोलंदाजी करताना तो भारतीय सलामीवीरांना त्रास देऊ शकतो.
-
शाहीन हा या सामन्यामधील पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक असून भारताच्या सलामीवीरांना लवकर तंबूत पाठवण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.
-
राहुलने सराव सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने पॉवर प्ले दरम्यानही तुफान फटकेबाजी केलीय.
-
त्यामुळे नवीन चेंडूने आफ्रिदी कमाल दाखवणार की राहुल त्यालाही सीमेपल्याड चौकार-षटकार लगावणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
-
२) विराट कोहली विरुद्ध शादाब खान – या सामन्यामध्ये निर्णयाक ठरणारी आणखीन एक जुगलबंदी म्हणजे विराट कोहली विरुद्ध शादाब खान.
शादाब खान हा पाकिस्तानचा फिरकीपटू असून तो लेग स्पीनसाठी ओळखला जातो. -
विराटचा अडसर दूर करण्यासाठी शादाब हे पाकिस्तानचं महत्वाचं अस्त्र असणार आहे.
-
लेग स्पीनला विराट अनेकदा गोंधळतो आणि फिरकी त्यातही लेग स्पीन हा विराटचा विक पॉइण्ट आहे.
-
शादाबच्या फिरकी समोर विराटचा गोंधळ उडेल अशी पाकिस्तानी संघाला अपेक्षा आहे तर विराटने आपला पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड अधिक बळकट करावा असं भारतीय चाहत्याचं म्हणणं आहे,
-
विराटचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड त्याच्या बाजूने असल्याने तो या सामन्यात आत्मविश्वासाने फलंदाजी करेल असं दिसत आहे.
-
पाकिस्तानविरुद्धच्या सहा टी २० सामन्यांमध्ये विराटने ८४ च्या सरासरीने २५४ धावा केल्यात.
-
आता शादाबच्या फिरकीला विराट कसं उत्तर देतो हे सामन्यामध्येच पहायला मिळेल.
-
३) बुमराह विरुद्ध बाबर आझम – बाबर आझम हा पाकिस्तानच्या डावाला आकार देण्यासाठी जीव ओतून फलंदाजी करेल यात शंका नाही.
-
तर बाबर आझमला चांगली सुरुवात करुन देण्यापासून रोखण्यासाठी भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रित बुमराह पूर्णपणे प्रयत्न करताना दिसेल.
-
पॉवर प्लेदरम्यान बाबर उत्तम फलंदाजी करतो.
-
बाबर आझम हा सध्याच्या घडीला जगातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे.
-
अनेकदा बाबर आझमची तुलना विराट कोहलीशी केली जाते.
-
मात्र बाबार कितीही उत्तम फलंदाज असला तरी बुमराहचे थेट मीडल स्टम्पवर जाऊन आदळणारे यॉर्कर खेळून काढणं हे आझम समोरचं मोठं आव्हान असणार आहे.
-
बुमराहसाठी चिंतेचा विषय आहे त्याची पाकिस्तानविरुद्धची आकडेवारी. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये बुमराह फारसा प्रभावी ठरल्याचं दिसलेलं नाहीय.
-
३ एकदिवसीय सामने आणि एका टी २० सामन्यात बुमराहने पाकिस्तानविरुद्ध केवळ एकच विकेट घेतलीय. त्यामुळे आपल्या खात्यावरील विकेटची संख्या वाढवण्यासाठी बुमराह जोरदार प्रयत्न करेल असं चित्र दिसत आहे.
-
४ ) मोहम्मद शमी विरुद्ध मोहम्मद रिझवान – मोहम्मद शमीवर भारतीय गोलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी असेल यात शंका नाही.
-
उजव्या हाताने जलद गोलंदाजी करणारा शमी सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.
-
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये शमीने तीन विकेट्स घेत या सर्वोच्च स्तरावरील टी २० स्पर्धेत यंदा भारतीय गोलंदाजीची जबाबदारी योग्य खांद्यावर असल्याचे संकेतच दिले होते.
-
दुसरीकडे मोहम्मद रिझवान पाकिस्तानसाठी मौक्याच्या क्षणी धावून येणारा खेळाडू आहे.
-
पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरला बळकटी देणारं मोहम्मद रिझवान हे महत्वाचं नाव आहे.
-
यंदाच्या वर्षात पाकिस्तानी संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मोहम्मद रिझवानची ओळख आहे.
-
मोहम्मद रिझवानने या वर्षीत ४० च्या सरासरीने ७५२ धावा केल्यात.
-
आता विराटच्या अपेक्षांप्रमाणे शमी गोलंदाजी करुन पाकिस्तानी फलंदाजाची पाठीचा कणा असणाऱ्या रिझवानला तंबूत पाठवतो का हे सामन्यातच स्पष्ट होईल.
-
५) रविंद्र जडेजा विरुद्ध मोहम्मद हाफीज – आयपीएलमधील आपला भन्नाट फॉर्म कायम ठेवत अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघातील सर्वात विश्वासाचा चेहरा म्हणजे रविंद्र जडेजा.
-
हार्दिक पांड्याच्या संघातील समावेशासंदर्भात शंका उपस्थित केली जात असल्याने जडेजाच्या कामगिरीचं महत्व आणखीन वाढलं आहे.
-
भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी समोर असताना फलंदाजीबरोबरच जडेजाने काही पाकिस्तानी फलंदाजांनाही आपल्या फिरकीत गुंडाळावं अशीच सर्व भारतीयांची अपेक्षा असणार आहे.
-
सर जडेजा अशी ओळख असणारा हा खेळाडू दरवेळेस भारतीय संघाच्या मदतीला धावून आल्याचं दिसलं आहे.
-
अगदी मौक्याच्या क्षणी धावगती वाढवणे, फरकीच्या मदतीने झटपट एक दुसरी विकेट घेत सामना फिरवण्याचं कौशल्य जडेजाकडे आहे.
-
दुसरीकडे ४१ वर्षीय मोहम्मद हाफीज हा पाकिस्तानी संघातील सर्वाधिक अनुभव असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
-
मोहम्मद हाफीजकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
-
हाफीजसाठी ही स्पर्धा आयसीसीची शेवटची स्पर्धा असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या स्पर्धेनंतर हाफीज निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
-
त्यामुळे मोहम्मद हाफीज आपल्या कामगिरीची छाप पाडण्यासाठी उत्सुक असेल यात शंका नाही. (सर्व फोटो ट्विटर, आयसीसी, बीसीसीआय, पीसीबी, रॉयटर्स, एपीवरुन साभार)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य