-
टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केलं. (Photo- Reuters)
-
भारताने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठलं. टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. (Photo- Reuters)
-
रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. (Photo- Reuters)
-
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत अखेरची टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. यापूर्वी भारताने टी-२० विश्वचषकातील पाचही विजय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. (Photo- BCCI)
-
२०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत भारताला कोहलीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. (Photo- AP)
-
भारताने त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात सात (१९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५, २०१९) आणि टी-२० विश्वचषकात पाच (२००७मध्ये दोन वेळा, २०१२, २०१४, २०१६) सामने जिंकले होते. (Photo- AP)
-
२९ वर्षानंतर पाकिस्तानने भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत केलं आहे. (Photo- Reuters)
-
भारताला यापूर्वी कधीही टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात १० गडी राखून मात मिळाली नव्हती. (Photo-AP)
-
भारताला यापूर्वी फक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने जास्तीत जास्त ९ गडी राखून भारताला पराभूत केलं आहे.
-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा भारताला १० गडी राखून पराभव सहन करावा लागला आहे. यापूर्वी २०२० मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १० गडी राखून पराभूत केलं होतं. (Photo-AP)
-
टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा टीम इंडिया पहिल्या सामन्यात पराभूत झाली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला २०१६ टी २० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. (Photo- PTI)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य