-
आयपीएल २०२२पासून १० संघ खेळवले जाणार आहेत. आज दुबईत अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांची घोषणा झाली. त्यामुळे जगात सर्वात श्रीमंत असलेली ही क्रिकेटची टी-२० लीग आता अधिकच मोठी झाली आहे. जाणून घ्या नवीन संघांसह इतर संघांना किती बोली लागली होती.
-
संजीव गोयंकांच्या आरपीएसजी समूहाने ७,०९० कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली. त्यांनी लखनऊ हा संघ विकत घेतला.
-
तर CVC कॅपिटल अहमदाबाद संघाचा मालक झाला आहे. आरपीएसजी समूह आणि CVC कॅपिटल यांनी अदानी आणि मँचेस्टर युनायटेडची मालक असलेल्या ग्लेझरला बाहेर ढकलत दोन नवीन संघांची बोली जिंकली आहे.
-
रिलायन्स इंडिया लिमिटेड मुंबई इंडियन्स संघाचा मालक आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेत सर्वात यशस्वी फ्रेंचायझी राहिली आहे, त्यांनी एकूण पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. या संघाला १११.९ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
युनायटेड ब्रेवरीज ग्रुपकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे. या संघाला १११.६ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
डेक्कन क्रॉनिकलने डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघ विकत घेतला होता. या संघाला १०७ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
इंडिया सिमेंट्सकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी आहे. त्यांनी ९१ मिलियन डॉलर्सला संघ विकत घेतला होता.
-
GMR समूहाने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ विकत घेतला होता. आता हा संघ दिल्ली कॅपिटल्स म्हणून ओळखला जातो. या संघाला ८४ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांनी किंग्ज इलेव्ह पंजाब संघ विकत घेतला आहे. आता हा संघ पंजाब किंग्ज म्हणून ओळखला जातो, या संघाला ७६ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट कोलकाता नाइट रायडर्सची मालक कंपनी आहे. या संघाला ७५.०९ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
एमर्जिंग मीडियाने राजस्थान रॉयल्स संघ विकत घेतला. या संघाला ६७ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
सहारा इंडिया परिवारने पुणे वॉरियर्स इंडिया संघ विकत घेतला. आता हा संघ आयपीएलमध्ये खेळत नाही. या संघाला ३७० मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.
-
रेंडेस्वस स्पोर्ट्स वर्ल्डने कोची टस्कर्स संघ विकत घेतला होता. या संघाला ३३३.२ मिलियन डॉलसर्ची बोली लागली होती.

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक